22 November 2024 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू

Minister Bacchu Kadu

अमरावती, १३ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या भूमिका बजावायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी बजावल्याच नाही. त्यामुळे आज जी आपत्ती आली आहे ती देशासोबत राज्यावर येऊन पडली आहे. देशात जर योग्य नियोजन झाले असते तर आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते,” असा जोरदार हल्लाबोल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल (12 मे) अहमदनगरला प्रहार कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. त्यासोबतच राज्यातील लसीच्या तुटवड्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते मोदींकडे गेले का? आम्हाला लसीकरण जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या असे एक तरी निवेदन त्यांनी पंतप्रधानांना दिले का? असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात राहून सरकारवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ते केंद्रातून काय आणू शकले याचे उदाहरण देवेंद्रजींनी द्यावे, मग त्यांना बोलायचा अधिकार आहे, असा टोला त्यांनी लगावला. केंद्राने महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. देवेंद्रजी तुम्ही आकडे समोर घेऊन बसलात तर तुमच्या लक्षात येईल, असे प्रत्युत्तर बच्चू कडूंनी केले.

दरम्यान, लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत आणखी घट होण्यासाठी राज्यात १५ मेपर्यंत लागू केलेले निर्बंध ३१ मेपर्यंत वाढवावेत, असे मत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे राज्यात ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवला जाईल, असे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केले.

देशातील ज्या जिल्ह्यांत संसर्गाचा दर १०%हून अधिक आहे तेथे ६ ते ८ आठवड्यांचे कडक लॉकडाऊन लागू केले पाहिजे, असे आवाहन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी केले. कडक लॉकडाऊन केला तरच या जीवघेण्या महामारीवर नियंत्रण शक्य होईल, असे आयसीएमआरचे प्रमुख भार्गव म्हणाले.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis is the main leader of Bharatiya Janata Party. Did he go to Modi? Did he give a single statement to the Prime Minister asking him to give us more vaccinations or other materials? Such a question has been raised by Minister Bacchu Kadu.

News English Title: Minister Bacchu Kadu criticized Devendra Fadnavis for not demanding anything from PM Narendra Modi during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x