17 April 2025 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

उद्धव ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते - बच्चू कडू

Minister Bacchu Kadu, Ex CM Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray

अमरावती, २० ऑक्टोबर : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पावसाने किती नुकसान झाले आहे याची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी करुन, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल”, असे आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं आहे.

बच्चू कडू यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतल्याने, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वांना सरसकट नुकसान भरपाई मिळेल असं यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, सरकार चालवायला दम लागतो अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जेव्हा राज्यात फडणवीस यांचे सरकार होते तेव्हा त्यांना उद्धव ठाकरे यांचाच दम होता त्यामुळे त्यांना दम विचारण्याचा काहीच विषय नाही. उद्धव ठाकरेंचा दम त्यांना नसता तर ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नसते असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय दम आहे तो त्यांनी दाखवून दिला आहे. कोरोना संकटासह नैसर्गिक संकटावर ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी मात केली, हे दम असल्याशिवाय शक्य नाही. सत्ता गेल्यानं देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झालेत, त्यांनी संयम ठेवायला पाहिजे.’

 

News English Summary: Minister of State Bachchu Kadu has targeted Fadnavis. He said that when Fadnavis was in power in the state, he had the breath of Uddhav Thackeray, so there was nothing to ask him. Bachchu Kadu has also said that if he did not have the breath of Uddhav Thackeray, he would not have been the Chief Minister for five years.

News English Title: Minister Bacchu Kadu criticized Ex CM Devendra Fadnavis on his remark on CM Uddhav Thackeray News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या