24 November 2024 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

ओबीसींच्या आरक्षणावरून फडणवीसांचा भुलभुलैय्या | कोर्टाकडूनच ओबीसींच्या संख्येची विचारणा - भुजबळ

Minister Chhagan Bhujbal

मुंबई, ०१ जून | दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावरून महत्वाचा निर्णय दिला. त्यावरून भाजप नेत्यांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरवात केल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असलेल्या दाव्यात काही तथ्य नाही. फडणवीस हे भुलभुलैय्या करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या विषयावर आम्हाला राजकारण करायचं नसल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज पदोन्नतीतील आरक्षणाबाबत बैठक झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. या बैठकीनंतर भुजबळांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून फडणवीस भुलभुलैय्या करत आहेत. आम्हाला त्यावर राजकारण करायचे नाही, असं भुजबळ म्हणाले.

न्यायालयाकडून ओबीसींच्या लोकसंख्येची विचारणा केली जात होती. त्यामुळे जनगणनेचे आकडे केंद्राकडे आहेत. आमच्याकडे नाहीत. तुम्ही केंद्राला आदेश दिले तर आम्ही तुम्हाला हे आकडे देऊ शकतो, असं आम्ही कोर्टाला सांगितलं होतं, असं त्यांनी सांगितलं

 

News English Summary: Two days ago, the Supreme Court passed a landmark judgment on OBC reservation in local bodies. From that, it was seen that BJP leaders started making allegations against the state government again. Opposition leader Devendra Fadnavis’s claim about OBC reservation in local bodies is baseless.

News English Title: Minister Chhagan Bhujbal criticized oppositions leader Devendra Fadnavis over OBC reservation news updates.

हॅशटॅग्स

#ChhaganBhujbal(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x