5 November 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी | मुख्यमंत्र्यांना पत्र

Minister Dhananjay Munde, Postponement of JEE, NEET, MPSC exams

बीड, २६ ऑगस्ट : कोरोना महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत जेईई, नीट परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी. यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी तसेच येत्या 20 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

केंद्रीय स्तरावर इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई (JEE) परीक्षा तसेच वैद्यकीय शिक्षणास प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट (NEET) परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या घेणे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे ठरू शकते. या परीक्षेमध्ये राज्यातूनही लाखो विदयार्थी आपले नशीब आजमावणार आहेत. परंतु सध्यस्थितीत ही परीक्षा घेणे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे ही परीक्षा काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्याबाबत आग्रही मागणी करावी, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

या परीक्षेची तारीख कोरोनामुळे याआधीही बदलण्यात आली आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीतीमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एमपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी, शैक्षणिक साहित्य यांसह इतर बाबींचाही अडचण झालेली आहे, त्यामुळे ही परीक्षा देखील आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात यावी, असे धनंजय मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

याशिवाय, एमपीएससी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा काठावर आहेत त्यांच्यावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अन्याय होऊ नये, याची काळजी घेऊन निर्णय घेण्यात यावा असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान जेईई , नीट तसेच एमपीएससी या तीनही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, दळणवळणाच्या बाबतीतील मर्यादा, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करत निर्णय घेण्यात यावा, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

News English Summary: Social Justice Minister Dhananjay Munde in a letter to Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar has demanded that the state government should make a request to the Center and postpone the pre-service examination (MPSC) to be held on September 20.

News English Title: Minister Dhananjay Munde demands postponement of JEE NEET MPSC exams in corona situation News Latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x