25 December 2024 11:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

झालेली घटना दुर्दैवी | मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही - एकनाथ शिंदे

Minister Eknath Shinde, Pooja Chavan, suicide case

मुंबई, १३ फेब्रुवारी: बीडच्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्यानंतर कथित 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमधील आवाज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा असल्याचं सांगत या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्रं लिहून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तर राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.

याबाबत संजय राऊत यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय. तर नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिलीय. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. प्रसार माध्यमांकडे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसेनेची या प्रकरणात ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

दुसरीकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची पावले उचलण्याची सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पूजा आत्महत्याप्रकरणातील सर्व माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडण्यासाठी बोलावून घेतलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता बळावली असून राठोड राहणार की जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

News English Summary: MP Sanjay Raut declined to comment on the matter. Urban Development Minister and Shiv Sena leader Eknath Shinde also reacted cautiously. Eknath Shinde said that the incident is unfortunate, but it is not appropriate to add the name of Minister Sanjay Rathore directly, it would be appropriate to speak after getting information in this case, it is not appropriate to name Minister Sanjay Rathore directly, said Eknath Shinde. Minister Eknath Shinde expressed this reaction to the media. This is the first reaction of Shiv Sena in this case.

News English Title: Minister Eknath Shinde talked on Pooja Chavan suicide case news updates.

हॅशटॅग्स

#EknathShinde(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x