7 January 2025 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER
x

राज्य सरकार विरोधात बोलण्यासाठीच राणेंना केंद्राचा लाडू मिळाला - गुलाबराव पाटील

Minister Gulabrao Patil

मुंबई, २७ जुलै | राज्य संकटात असताना राजकारण करणाऱ्यांनी थाेडा तरी विचार करायला हवा, असा सल्ला देत नारायण राणे हे मंत्री झाल्यापासून काेकणावर संकट आले. त्यामुळे तेच पांढऱ्या पायाचे असल्याचा टाेला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी लगावला.

राज्यावर संकट असताना मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. पक्षाचा विचार न करता संकटात सापडलेल्यांना मदत करणे हीच भावना असली पाहिजे. राजकारण करायला भरपूर आखाडे आहेत. त्या आखाड्या तुम्ही तुमचा झेंडा घेऊन उतरा आम्ही आमचा झेंडा घेऊन उतरू. त्या वेळी जनता ज्याला आशीर्वाद देईल, तो आपण मान्य करायचा असताे. मात्र, अशा संकटाच्या वेळी कुणीही राजकारण करताना विचार करायला हवा’ असा सल्ला मंत्री पाटील यांनी विरोधकांना दिला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील यांनी अपंगासाठी १० लाखांच्या साहित्याचे वाटप केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना मोठा लाडू भेटल्यामुळे त्यांना बोलणे गरजेचे आहे, बोलण्याकरताच त्यांना मंत्री केले आहे, ही चाबी भरल्याशिवाय हे खेळणे चालत नाही असे वक्तव्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात काल २ कोटी ४ लक्ष ५० हजार किंमतीचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट भूमिपूजन सोहळा सकाळी १०.०० वाजता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Gulabrao Patil criticized Union minister Narayan Rane over Konkan flood politics news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x