चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? | राष्ट्रवादीचं टीकास्त्र

कोल्हापूर, ७ डिसेंबर: कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करतानाच, ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास विरोध करण्यासाठी व दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
या बंदला महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन करत ते म्हणाले, महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, पण, मुळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषिमंत्री असताना केलेले आहेत.’
दुसरकडे केंद्रातील मोदी सरकार नव्या कृषी विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे हित साधणार आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गळ्यात पक्षाचा मफलर घालून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगण्याची हिंमत दाखवावी. त्यावर शेतकरीचं त्यांना पायातील काढून उत्तर देतील, अशी तिखट प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली (MahaVikas Aghadi Minister Satej Patil) आहे. कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. कृषी कायद्यात बद्दल होणार नाही, हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra State President Chandrakant Patil) यांचे विधान यालाच समर्थन देत आहे”.
“नव्या कृषी कायद्यातून शेतकऱ्यांचा कसलाही लाभ होणार नाही. अंबानीची जिओ कंपनी सुरू झाल्यावर शासकीय बीएसएनएल दूरध्वनी कंपनी देशोधडीला (When Ambani’s JIO Company was started, the Indian Government run BSNL telephone company gone in huge problem) लागली. तशीच अवस्था शेतकऱ्यांची या विधेयकामुळे होणार आहे,” असा आरोप मंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. “इचलकरंजी कापड व्यापारी दिवाळे काढून वारंवार पळून जातात. तसेच शेतकरी कायद्यामुळे कार्पोरेट कंपन्या पळून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचा उद्याच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देणार आहे,” असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
News English Summary: Is Chandrakant Patil the Prime Minister of the country or the Minister of Agriculture? While asking such a question, they are deliberately adding fuel to the fire, alleged the state’s Rural Development Minister Hasan Mushrif. An India Bandh was called on Tuesday to oppose the BJP government’s agriculture bill and to support the agitation started by farmers in Delhi.
News English Title: Minister Hasan Mushrif criticized BJP State President Chandarkant Patil over New agriculture law statement news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल