21 April 2025 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

राज्याला सोडाच कोल्हापूरलासुद्धा चंद्रकांत पाटलांचा उपयोग झाला नाही | मुश्रीफ यांनी सुनावले

Minister Hasan Mushrif, BJP state president Chandrakant Patil

पुणे, २२ नोव्हेंबर: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी पुण्यात ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राजकारणात येण्याआधी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. पण, राजकारणात आल्यावर समजले की, शरद पवार खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं पाटील यांनी मोठं कौतुक केलं होतं. फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची पूर्ण दक्षता त्यांनी घेतली. यासाठी खोलात जाऊन त्यांना कायद्याचा अभ्यास केला. असे असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजांत अंतर निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. असे विष कालवणाऱ्यांचा शर्ट धरला पाहिजे, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र त्यानंतर पाटील यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांनी आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार घेतला. मुश्रीफ म्हणाले की “बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. चंद्रकांत पाटील यांना काहीही न करता दोनदा मोठी संधी मिळूनही त्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.”

 

News English Summary: Minister Hasan Mushrif took the news of Chandrakant Patil’s criticism of Sharad Pawar at a campaign rally of graduates and teachers in Ajra. Mushrif said that Sharad Pawar created a new Maharashtra under the leadership of Bahujan. His contribution as the Chief Minister of Maharashtra, including the posts of Agriculture Minister and Defense Minister, is immense. Even though Chandrakant Patil got a big opportunity twice without doing anything, it did not help the state, let alone Kolhapur district.

News English Title: Minister Hasan Mushrif slam BJP state president Chandrakant Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या