बॅलेट पेपरने निवडणुकीचा निकाल काय लागतो ते दिसलं | काश EVM होता तो

कोल्हापूर, ४ डिसेंबर: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif reaction after MLC Election Result in favor of MahaVikas Aghadi government) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना हा दावा फेटाळून लावला आहे. राज्यात तीन पक्ष एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे या निवडणुकीतून दिसून आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) मुंबईत राहू लागल्यापासून त्यांचं नागपूरकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळेच नागपूरचे एक एक गड त्यांच्या हातून निसटून जात आहे, अशी खोचक टीका मुश्रीफ यांनी केली.
बॅलेट पेपर (Vote counting on ballet paper) असल्यावर निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे. ईव्हीएम नसल्यामुळेच महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचं जनतेचं मत झालं आहे. आपलं मत सार्थकी लागल्याची भावनाही जनतेमध्ये निर्माण झाली आहे, असं सांगतानाच आता फडणवीस आणि चंद्रकांतदादाही काश, ईव्हीएम होता तो अच्छा होता, असं म्हणत असतील, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
या निवडणुकीत आघाडीला यश मिळावं म्हणून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले. ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी झाली. या आधी या निवडणुका कधी पक्ष पातळीवर झाल्या नव्हत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या निवडणुकांमध्ये पूर्वी कधीच इतकं लक्ष घातलं नव्हतं. यावेळी दोन्ही पक्षांनी मतदार नोंदणीपासूनच लक्ष घालायला सुरुवात केली होती, असं ते म्हणाले.
News English Summary: This election has shown what the result of the election can be if there is a ballot paper (Vote counting on ballot paper). Due to the absence of EVM, the people have come to believe that the Mahavikas Aghadi has achieved great success. While saying that the people have a feeling that their opinion is meaningful, now Fadnavis and Chandrakantdada are also saying that Kash, EVM was good, minister Hasan Mushrif criticized.
News English Title: Minister Hasan Mushrif slams BJP after MLC election result news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल