6 November 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

पडळकर कोणाचे चमचे | धनगर समाजासाठी आरक्षण न घेताच ते भाजपकडून आमदार झाले - मुश्रीफ

Minister Hasan Mushrif, BJP MLA Gopichand Padalkar, MP Sanjay Raut

कोल्हापूर, १८ डिसेंबर: सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. पडळकर यांनी राऊतांना थेट पत्रच लिहिलं. त्यात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत अनेक मुद्द्यांवर राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न पडळकरांनी केला.

“खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे”, अशा शब्दात पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले.

त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासारखे पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिजे आहेत. पडळकर यांचा बोलवता धनी वेगळा आहे. त्याने पडळकर यांना आवरावे, असा इशारा राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला. (MahaVikas Aghadi minister Hasan Mushrif slams BJP MLA Gopichand Padalkar)

ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे हात धुऊन लागलेल्या गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बारामतीमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी आजच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

धनगर समाजासाठी आरक्षण न घेताच गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाकडून आमदार झाले. ही कशाची बक्षिसी आहे. गोपीचंद पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिले आहेत, अशी बोचरी टीका मुश्रीफ यांनी केली.

 

News English Summary: He targeted Gopichand Padalkar, who was washing his hands behind the NCP. Gopichand Padalkar had agitated in Baramati for reservation of Dhangar Samaj. At that time, today’s Leader of the Opposition had promised to give reservation to the Dhangar community in the first cabinet meeting. After five years in power, he could not make reservations. Hasan Mushrif raised the question as to whose spoon Gopichand Padalkar was then.

News English Title: Minister Hasan Mushrif slams BJP MLA Gopichand Padalkar after reaction on MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x