16 April 2025 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

कोल्हापुरात स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय? | मुश्रीफ यांचा चंद्रकांतदादांना टोला

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर , ०७ ऑगस्ट | मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं. तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक वार केला.

त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय; अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही खोचक टीका केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील बोलतात हे आक्षेपार्ह आहे. पाटील यांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. अन् पवारांना माढामधून मागे घालवल्याचे बोलतात. येत्या काळात असं बोलणं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देतानाच स्वत:चं गाव राखता आलं नाही आणि संजय राऊत यांना कशाला आव्हान देता?, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Hasan Mushrif slams BJP state president Chandrakant Patil over challenge to MP Sanjay Raut news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या