5 January 2025 8:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

भाजपाच्या काळात मला अडकवण्यासाठी बँकेची चौकशी लावली | पण सत्य उजेडात आलं

Minister Hasan Mushrif, Chandrakant Patil, state co operative bank case, clean chit

कोल्हापूर, १९ फेब्रुवारी: राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 6६५ संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून हा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला. चौकशी अहवालात अजित पवारांसह ६५ संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे.

२५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.

सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह ७० जणांवर कलम ४२०, ५०६, ४०९, ४६५ आणि कलम ४६७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांची नावं होती.

दरम्यान या समितीच्या अहवालानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मुश्रीफ म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात फक्त मला अडकवण्यासाठी राज्य सहकारी बँकेची कलम ८८ नुसार चौकशी लावली होती, त्यास उच्च न्यायालयातून आम्ही स्थगिती आणली. अखेर सत्य उजेडात आलं असून विजय नेहमी सत्याचाच होतो असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या चौकशीसाठी माजी न्यायाधीशांची नेमणूक केली, त्यामध्ये राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे काहीही नुकसान केलेले नाही हेच सिद्ध झाले, उलट बँकेचा फायदा झाला, विनाकारण मला राजकीय द्वेषभावनेतून अडकवण्याचा प्रयत्न केला होता, राज्य बँकेच्या एकाही बैठकीला उपस्थित नसताना राजकीय द्वेषातून मला जाणीवपूर्वक गुंतवले होते असा आरोप हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.

 

News English Summary: After the committee’s report, Rural Development Minister Hasan Mushrif has targeted BJP state president Chandrakant Patil. Mushrif said, “During the BJP government, the state co-operative bank was investigated under Section 88 only to get me involved. We adjourned it from the High Court. He has said that the truth has finally come to light and victory is always for the truth.

News English Title: Minister Hasan Mushrif slams Chandrakant Patil over state co operative bank case clean chit news updates.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x