3 January 2025 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Car Buying Tips | नवीन वर्षात घरासमोर उभी करा नवीकोरी कार, अशा पद्धतीने डील केल्यास मिळेल जास्तीत जास्त फायदा SIP Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी जानेवारी धमाका, एकूण 4 इक्विटी योजना होणार लॉन्च, जाणून घ्या तारीख NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519
x

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील तरुण नाराज झाले आहेत - हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, ०७ ऑगस्ट | मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही खोचक टीका केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील बोलतात हे आक्षेपार्ह आहे. पाटील यांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. अन् पवारांना माढामधून मागे घालवल्याचे बोलतात. येत्या काळात असं बोलणं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देतानाच स्वत:चं गाव राखता आलं नाही आणि संजय राऊत यांना कशाला आव्हान देता?, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील भेटीवर प्रतिक्रिया:
चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट झाली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट फिक्स होती का माहीत नाही. पण राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील तरुण नाराज झाले आहेत, असं ते म्हणाले.

राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर:
नाशिक आणि पुण्यातील मोर्चेबांधणीनंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवणार आहेत. त्यादृष्टीने मनसेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे लवकरच मराठवाड्यात सभा घेणार आहेत. या बैठकांसाठी तयारील लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Hasan Mushrif talked on Raj Thackeray and Chandrakant Patil meet news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x