22 November 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने आणि विरोधी पक्षाशी सल्ला मसलत करुन राज्यात काम करतेय - जयंत पाटील

Minister Jayant Patil

सोलापूर, १७ जुलै | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मोदींची भेट घेण्यापूर्वी पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केल्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवार आणि मोदी भेटीमागचं नेमकं कारण सांगितलं आहे. जयंत पाटील यांनी बँकांवर निर्बंध आणण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. ती बंधनं कमी करण्यासाठी शरद पवार दिल्ली मोदींच्या भेटीला गेले आहेत. पवार यांना बँकिंग क्षेत्रातील लोकांनी निवेदन पाठवली आहे. त्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदी यांची भेट झाल्याचं पाटील म्हणाले.

दुसरीकडे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्याची चौकशी सुरु अशल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यावर बोलताना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागते हे निष्पन्न झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. विरोधी पक्षाशी सल्ला मसलत करुनच महाराष्ट्रात ईडी सारखी संस्था काम करतेय हे दुर्दैवी असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Jayant Patil made serious allegation over ED actions in state news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x