तुम्ही महाराष्ट्रातील नेते, केंद्राबरोबर भांडू नका पण किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा - जयंत पाटील

मुंबई, ९ एप्रिल: भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशात कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. पण आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात साडेपाच दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी पुढील आठवड्यात राज्यांमध्ये कोरोना लशीचे डोस पाठवले जाणार आहेत. अनेक राज्यांनी केंद्राकडे कोरोना लशीची मागणी केली आहे. सध्या देशात 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे.
आरोग्या मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आंध्रप्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात केवळ 2 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. ओडिशामध्ये जास्तीत जास्त 4 दिवस पुरेल एवढा कोरोना लशीचा साठा शिल्लक आहे. बहुतांशी राज्यांत हीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यांच्या चिंता वाढताना दिसत आहेत. एकीकडे कोरोना विषाचे रुग्ण वाढत असताना, लशीचा तुटवडा जाणवणे चिंतेची बाब आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचे नेते राज्य संकटात असताना इथल्याच लोकांच्या अडचणी वाढविण्याचा राजकीय पराक्रम करताना दिसत आहेत. यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांचे चांगलेच कान टोचले आहेत. राज्याला लस जास्त कशी मिळेल असा प्रयत्न करा… तुम्ही महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडताय… अहो केंद्राबरोबर भांडू नका किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
लस उपलब्ध नाही म्हणून लसीकरण वेगवेगळ्या ठिकाणी थांबलं आहे ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली अशी विचारणाही जयंत पाटील यांनी फडणवीसांना केली. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयात लसीचा पुरवठा पुरेसा आहे तिथे लसीकरण सुरू आहे. दुर्दैवाने राज्यात लसीची कमतरता पडायला लागली आहे. सगळ्या जिल्ह्यातून ही ओरड सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांना हे माहित असेल तर कोणत्या जिल्हयात लसीची जास्त उपलब्धता आहे तर त्या जिल्हयाचं आणि तालुक्याचे नाव सांगावं आम्ही त्याठिकाणी लसीकरणाचा काय दर आहे, किती वेगाने सुरू आहे हे लगेचच सांगू शकतो. शेवटी राज्यातील जनतेला म्हणजे आमचंच राज्य आणि आमच्याच जनतेला घाबरवू हा कुठला प्रकार आहे असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लसीकरण केले जात आहे. महाराष्ट्रासारखं लसीकरण कुणीही करु शकत नाही. आम्हाला लस कमी पडतेय म्हणून तर मागणी करतोय. फडणवीसांनी दिल्लीची बाजु घेऊन बोलणं आवश्यक नाही किंवा ते अभिप्रेत नाही. त्यांनी महाराष्ट्राच्यावतीने लसीचा पुरवठा केंद्राने लवकर करावा अशी मागणी केली असती तर मला आनंद झाला असता असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
News English Summary: On the other hand, BJP leaders in Maharashtra are seen doing political maneuvers to increase the problems of the people here when the state is in crisis. Water Resources Minister Jayant Patil has pierced the ears of Fadnavis. Try to figure out how the state can get more vaccines … You are quarrelling with the leaders of Maharashtra and Maharashtra itself … Oh, don’t quarrel with the Center, at least join to make a demand.
News English Title: Minister Jayant Patil slams State BJP over politics on corona vaccine supply news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल