22 January 2025 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स तरीही ते जवाबदारीने...

Minister Jitendra Awhad, CM Uddhav Thackeray, Lockdown

मुंबई, ३ एप्रिल: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. ते म्हणाले की, “बंगाल, आसाम अशा आणखी काही राज्यात निवडणूका आहेत तिथे कोरोना वाढत नाही का? तर मी त्यांना सांगू इच्छितो की मला तिथे काय सुरू आहे त्याबद्दल बोलायचं नाही.

मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे. मला माझ्या जनतेची काळजी आहे. त्यामुळे मला तुम्ही सगळ्यांनी व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणार”.पुढे ते असं देखील म्हणाले की, “लसीकरण वाढवा असं म्हणत आहात पण मी सगळ्यांना (विरोधकांना) सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे जिथे लसीकरण मोठया प्रमाणात आणि वेगाने होत आहे. पण लसीचा पुरवठा आणखी व्हायला हवा”, असं देखिल त्यांनी सांगितलं आहे. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊन होण्याच्या धास्तीने त्यांच्यावर टीका देखील तितकीच होऊ लागली आहे. तर विरोधक देखील तुफान टीका करत आहेत. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भावनिक बाजू समोर आणत त्यांची बाजू सावरली आहे.

यासंदर्भात ट्विट करताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, “पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत….त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!

 

News English Summary: Tweeting about this, Housing Minister Jitendra Awhad said, “His wife is in the hospital, his son is also fighting with Kovid. Still, this man is managing Maharashtra with patience. It is easy to criticise. But it is difficult to be Uddhav Thackeray. Uddhavji Thackeray is managing Maharashtra …. salute him! Salute !! salute!

News English Title: Minister Jitendra Awhad protect CM Uddhav Thackeray after oppositions targeting him news updates.

हॅशटॅग्स

#Jitendra Awhad(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x