20 April 2025 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

हे पत्र आपणच ५ महिन्यांनी काढलं, आत्ता घाई का करता आहात? - जितेंद्र आव्हाड

Minister Jitendra Awhad, retweeted, Devendra Fadnavis

मुंबई, ०१ एप्रिल: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या भष्ट्राचाराच्या झालेल्या गंभीर आरोपांची चौकशी व्हावी यासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली. या समितीवरून देवेंद्र फडणवीस यांनी टिकास्त्र सोडलं आहे. ज्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. मग फडणवीसांनी आणखी एक उत्तर दिलं.. त्या उत्तरावरही पुन्हा प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी हेच देवेंद्र फडणवीस यांच पत्र पुन्हा ट्विट करत त्यावर एका ओळीचं उत्तर लिहिलं ‘हे पत्र आपणच पाच महिन्यांनी काढलं, आत्ता घाई का करता आहात?’ आव्हाड यांच्या या ट्विटनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात काही ट्विट केलेलं नाही. मात्र या दोघांमध्ये झालेल्या ट्विटर वॉरची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. आता यांच्यातील हे ट्विट वॉर असेच सुरु राहणार की याला पुर्णविराम लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

तत्पूर्वी समितीला दिलेल्या अधिकारासंदर्भात फडणवीस म्हणाले होते की, चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार दिलेले नाहीत. कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट १९५२ अंतर्गत ही समिती गठित केलेली नाही, त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केलेले नाहीत. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठित करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान केले होते. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी झोटिंग समिती नियुक्त केली होती.

 

News English Summary: Minister Jitendra Awhad retweeted the same letter from Devendra Fadnavis and wrote a one-line reply to it, “You took out this letter five months later, why are you in a hurry now?” However, the discussion of the Twitter war between the two has spread well on social media.

News English Title: Minister Jitendra Awhad retweeted the same letter from Devendra Fadnavis and wrote a one line reply to it news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या