5 November 2024 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे - राज्यमंत्री बच्चू कडू

Minister of state Bacchu Kadu, Mahavikas Aghadi government, Inferior seeds to farmers

अमरावती, २३ ऑगस्ट : राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांच्या मुद्द्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली झाल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. ते शनिवारी चांदूर बाजार तालुक्यातील शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कृषी खात्याला खडे बोल सुनावले.

काही दिवसांपूर्वीच बोगस बियाणांमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. यामधून शेतकरी सावरत नाही तोच अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. मात्र, सरकार किंवा कृषी खात्याकडून त्यांची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. ही परिस्थिती पाहून बच्चू कडू यांनी कृषी खात्याला धारेवर धरले. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे आता कृषी खात्याकडून या समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘सोयाबीन पिकवणारा शेतकरी यंदा पूर्णपणे घायाळ करून टाकला आहे. पेरलं तेव्हा निघालं नाही आणि पीक हातात आलं तेव्हा मारून टाकलं. राज्यातलं कृषी खातं झोपलंय की काय अशी स्थिती आहे. जेव्हा बियाणांचं प्रमाणीकरण होतं, त्यावेळी काही बदमाशी होते का, असा प्रश्न मला पडतो. महाबीजनं बाजारातलं बियाणं घेतलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. बाजारातून सर्वात निकृष्ट बियाणं २-३ हजार रुपये क्विंटल दरानं खरेदी करून ८ हजार रुपये क्विंटल दरानं विकलं,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.

कृषी विभागाच्या कारभाराबद्दल बच्च कडूंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बियाणं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना थेट इशारा दिला. ‘दरवर्षी अशीच स्थिती आहे. ५० वर्षांत परिस्थिती जराही बदलेली नाही. बियाणं चांगलं मिळालं, असं एक वर्षही जात नाही. या प्रकरणात जो आरोपी आहे, कंपनीचा मालक आहे, त्याला धरून चोपलं पाहिजे. त्याच्याशिवाय यात सुधारणा होणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका कडू यांनी मांडली.

 

News English Summary: Minister of State Bachchu Kadu has given a nod to the Mahavikas Aghadi government on the issue of problems facing farmers in the state. State Minister Bachchu Kadu said that the state’s agriculture department was asleep.

News English Title: Minister of state Bacchu Kadu slams own government over Inferior seeds News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x