22 January 2025 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

Minister Sanjay Rathod, CM Uddhav Thackeray, Pooja Chavan

मुंबई, २८ फेब्रुवारी: विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राठोड हे पत्नी आणि मेव्हण्यासह कॅबिनेट बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राठोड यांच्या बाबत कॅबिनेटपूर्वीच काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं सरकारला या प्रकरणावरून पूर्णपणे कोडींत पकडले असून, राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

एकीकडे संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे विदर्भातील आमदार कामाला लागले आहेत. राठोड यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचा दावा या गटाकडून केला जात आहे. त्यामुळे राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी या गटानं लावून धरली आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूर्व, पश्चिम विदर्भाला मंत्रिपद मिळायला हवं, अशी या गटाची भावना आहे.

 

News English Summary: Forest Minister Sanjay Rathore will meet Chief Minister Uddhav Thackeray today amid pressure from the opposition to resign. Rathore, along with his wife and daughter-in-law, will meet the Chief Minister before the cabinet meeting. Therefore, a big decision is likely to be taken before Rathore in the case of Rathore.

News English Title: Minister Sanjay Rathod reached to meet CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x