15 January 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

अंबानीची जिओ आल्यानंतर BSNL देशोधडीला लागली | तीच अवस्था शेतकऱ्यांची या विधेयकाने होईल

Minister Satej Patil, Modi Government, new agriculture law, Farmers Protest

कोल्हापूर, ७ डिसेंबर: नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान ८ तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदवेळी दुपारी ३ वाजेपर्यंत देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली आहे. खरंतर, शेतकऱ्यांच्या या भारत बंदला सर्वच स्तरातून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे 8 तारखेला म्हणजेच उद्या सर्व व्यवहार आणि वाहतूक ठप्प राहिल असं बोललं जात आहे.

दुसरकडे विरोधकांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रातील मोदी सरकार नव्या कृषी विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे हित साधणार आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गळ्यात पक्षाचा मफलर घालून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगण्याची हिंमत दाखवावी. त्यावर शेतकरीचं त्यांना पायातील काढून उत्तर देतील, अशी तिखट प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली (MahaVikas Aghadi Minister Satej Patil) आहे. कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. कृषी कायद्यात बद्दल होणार नाही, हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra State President Chandrakant Patil) यांचे विधान यालाच समर्थन देत आहे”.

“नव्या कृषी कायद्यातून शेतकऱ्यांचा कसलाही लाभ होणार नाही. अंबानीची जिओ कंपनी सुरू झाल्यावर शासकीय बीएसएनएल दूरध्वनी कंपनी देशोधडीला (When Ambani’s JIO Company was started, the Indian Government run BSNL telephone company gone in huge problem) लागली. तशीच अवस्था शेतकऱ्यांची या विधेयकामुळे होणार आहे,” असा आरोप मंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. “इचलकरंजी कापड व्यापारी दिवाळे काढून वारंवार पळून जातात. तसेच शेतकरी कायद्यामुळे कार्पोरेट कंपन्या पळून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचा उद्याच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देणार आहे,” असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.

“त्यासाठी शेतकऱ्यांनी घर, शेत, बांधावर काळा झेंडा लावावा. लोक रस्त्यावर आल्यावर भारतीय जनता पक्षाचे सरकार घाबरत नाही, पण समाज माध्यमांवर टीका व्हायरल झाली की बैचेन होतात. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते, नागरिकांनी उद्या मोबाइलवर निषेधदर्शक काळा डीपी लावावा,” असे आवाहन त्यांनी केले.

 

News English Summary: Farmers will not benefit from the new agriculture law. When Ambani’s JIO Company was started, the state-run BSNL telephone company went into exile. The same situation will happen to the farmers due to this bill, ”Minister Satej Patil has alleged. “Ichalkaranji textile traders often go bankrupt and run away. There is also a risk of corporate companies fleeing due to the Farmers Act. Therefore, the Congress will support tomorrow’s nationwide bandh to oppose the law, “he said.

News English Title: Minister Satej Patil criticized Modi Government over new agriculture law news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x