22 February 2025 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

दमछाक होतं कसेबसे नवव्या फेरीत जिंकून आणि लॉटरी लागून झालेले आमदार - मंत्री सतेज पाटील

Minister Satej Patil, BJP state President Chandrakant Patil

पुणे, २३ नोव्हेंबर: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लॉटरी लागून निवडून आलेले होते. कारण, आठव्या नवव्या फेरीमध्ये त्यांना विजय मिळाला होता अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि जयंत साळगावकर यांच्या प्रचारासाठी मंत्री सतेज पाटील हे पंढरपूरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली.

यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर देखील जोरदार टीका केली आहे.भारतीय जनता पक्षाच्या विचारांना थांबवणं ही काळाची गरज आहे. त्यामुळेच राज्याच्या सत्तेमध्ये महाविकास आघाडीतील घटक एकत्र आलेले असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. तर यावेळी महाविकास आघाडीचा विजय पक्का असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

दुसरीकडे “देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

 

News English Summary: Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil was elected by lottery in the last election of Pune graduate constituency. Minister of State for Home Affairs Satej Patil has said that they had won in the eighth and ninth rounds. Minister Satej Patil had come to Pandharpur to campaign for Pune Division Graduate Constituency and Teachers Constituency candidates Arun Lad and Jayant Salgaonkar. He made the remarks while interacting with reporters.

News English Title: Minister Satej Patil slams BJP state President Chandrakant Patil news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x