22 November 2024 1:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

गौप्यस्फोट की राजकीय पुड्या? | रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत फडणवीसांना भेटायला तडफडत होते - निलेश राणे

Devendra Fadnavis

रत्नागिरी, २५ मे | शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान निलेश राणे लोकसभेत दोनवेळा रत्नागिरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मात्र याच मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्री, खासदार आणि आमदारांची मजबूत पकड असल्याने केवळ राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी असं ट्विट केल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे मुंबईतील पोलीस स्थानकांमध्ये वाद घालण्यासाठी देखील सहज उपलब्ध होणाऱ्या फडणवीसांना भेटण्यासाठी मंत्रिपदावरील व्यक्ती तडफडून वाट बघते हे देखील हास्यास्पद म्हणावं लागेल.

काय म्हणाले निलेश राणे?
“तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली” असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. तसेच, निलेश राणे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी आणखी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल लिहिले आहे. ‘देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी.

 

News English Summary: When Fadnavisji came to Konkan to inspect the storm, Uday Samant and his brothers were eager to meet him at Ratnagiri Guest House. Both of them somehow reached Saheb’s room and met him against Devendraji’s wishes. What the media is misrepresenting, please correct said Nilesh Rane.

News English Title: Minister Uday Samant and his brothers were eager to meet Devendra Fadnavis at Ratnagiri Guest House news updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x