23 December 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH
x

लोकांचा जीव जात असताना उत्सव कशाला | भविष्यात परिस्थिती अधिक भयावह होईल - वडेट्टीवार

Vijay Wadettiwar

मुंबई, १२ एप्रिल: दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असूनही राज्यात संक्रमितांची संख्या कमी झालेली नाही. याउलट कोरोना रुग्णांनी एक नवा विक्रम बनवला आहे. देशातील कोणत्याही राज्यांपेक्षा हा सर्वात मोठा आकडा आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन केस समोर आले. दरम्यान 349 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. worldometers नुसार नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. महाराष्ट्राने अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझीलला मागे टाकले आहे.

राज्यात मृत्यू दर 1.7 टक्के आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आता 5 लाख 65 हजार 587 झाले आहेत. मुंबईत गेल्या 20 दिवसांमध्ये 1,54,300 लोक संक्रमित झाले आहेत. रोज सरासरी 7,715 लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. येथे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 67,092 झाली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच, असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. वीकेंड लॉकडाऊन लावल्यानंतरही आज राज्यभर गर्दी होत आहे. ही गर्दी अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचं असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल तेव्हा होईल. परंतु, तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

 

News English Summary: The havoc of the corona in the state has increased. According to experts, the state will remain in an explosive situation till the end of May. State Relief and Rehabilitation Minister Vijay Wadettiwar has questioned why people celebrate when people are dying, saying that there is no alternative but to break the corona chain if there is a 14-day lockdown.

News English Title: Minister Vijay Wadettiwar raised many questions over state corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#VijayWadettiwar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x