9 January 2025 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील | पण....

Minister Vijay Wadettiwar, BJP, Sanjay Rathod resignations

मुंबई, १६ फेब्रुवारी: वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मीडिया ट्रायलचा परिणाम असल्याची टिका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सतत एका मंत्र्याचे नाव चर्चेत आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

या राजीनाम्याच्या वृत्तावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘आतापर्यत शिवसेनेच्या एकाही नेत्याने राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, यात तथ्य असेल तर हा मीडिया ट्रायलचा परिणाम आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. महिलांबाबत भाजप नेत्यांची डझनावरी प्रकरणे मला सांगता येतील. पण, त्यांना नैतिकता लागू होत नाही. तिथे नैतिकता संपुष्टात येते, असे वडेट्टीवार म्हणाले.’

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मंगळवारी मातोश्रीवर पाठवला असून तो मुख्यमंत्र्यांनी मान्य केला आहे. हा राजीनामा त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दिला की इतर काही कारणासाठी हे अद्याप स्पष्ट नाही. यासोबतच, राठोड यांच्या एका जवळच्या व्यक्तीने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. सोबतच, ही एक अफवा असल्याचाही दावा केला.

 

News English Summary: Vijay Wadettiwar said, “So far no Shiv Sena leader has confirmed the news of Rathore’s resignation. However, if this is true, it is the result of a media trial, Wadettiwar said. I can tell you dozens of cases of BJP leaders regarding women. But, morality does not apply to them. That’s where morality ends, “Vadettiwar said.

News English Title: Minister Vijay Wadettiwar slams BJP over minister Sanjay Rathod resignations news updates.

हॅशटॅग्स

#VijayWadettiwar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x