16 April 2025 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

आता लोकच यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत म्हणतील 'लाव रे तो व्हिडिओ' | वडेट्टीवार यांचा टोला

minister Vijay Wadettiwar

औरंगाबाद, ०७ ऑगस्ट | आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोलेबाजी केली. दोघांच्या भेटीचे व आतापर्यंतचे व्हिडिओ लोकच लावतील, सोशल मीडियावर आता “लाव रे व्हिडिओ” सुरू होईल असे म्हणत राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला.

केंद्राचे राज्यावर विशेष प्रेम:
ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने जनगणना केली असून त्यांच्याकडे तो सर्व डेटा आहे. आम्ही वारंवार मागणी करूनही ते देत नाहीत. भाजपची सत्ता राज्यात नसल्याने त्यांचे राज्याबाबत अधिक प्रेम उतू जात असल्याचा खोचक टोलाही वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला डेटा देण्याबाबत आदेशीत केल्यावर डेटा लवकर मिळेल. आगामी तीन महिन्यात हा डेटा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओबीसी आयोगाने त्यासाठी काम सुरू केले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट सांगितले.

औरंगाबादेत पार पडली बैठक:
मागास व आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळण्यासाठी शिष्यवृत्त्या, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण, इंग्रजी शाळेतील प्रवेशाबाबत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्त्यांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी काटेकोर तपासणी करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी औरंगाबादेत दिले. आश्रम शाळेच्या व विभागातील आपत्ती व्यवस्थापन आढावा विषयक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Vijay Wadettiwar statement over Raj Thackeray and Chandrakant Patil meet news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#VijayWadettiwar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या