15 November 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

सरकारमधील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला - चंद्रकांत पाटील

Ministers In The State, Huge Earnings, Transfer Of Officials, Chandrakant Patil

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे. याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.

पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिलेला असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे. राज्य सरकारने करोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यामध्ये अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे.”

तसेच मुळात कोरोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी चालू वित्तीय वर्षात बदल्या करू नयेत, असे सरकारचे मे महिन्यात धोरण होते तर जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या पंधरा टक्के बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हते. तसेच नंतर त्याला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचेही कारण नव्हते. राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे कोरोनाचे संकट असताना मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आली. कोरोनामुळे शाळा बंद असताना मुलांसाठी नव्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळविण्याचे आव्हानही निर्माण झाले. तसेच कोरोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला.

 

News English Summary: The ministers of the Mahavikas Aghadi government in the state have collected huge sums of money by transferring officials of their choice in several creamy places in the name of fifteen per cent transfer. BJP state president MLA Chandrakant Patil on Thursday demanded an inquiry from the CID.

News English Title: Ministers In The State Huge Earnings From The Transfer Of Officials Should Investigate From Cid Says Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x