15 January 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

राज्य पोलीस भरती | उर्दूत ट्विट | मलिक यांना रस फक्त अल्पसंख्यांच्या ट्रेनिंगमध्ये?

Minority youths, Maharashtra Police Recruitment, Minister Nawab Malik, Urdu Language

मुंबई, २० ऑगस्ट : राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले होते. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. या बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. स्वत: देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.

मात्र सध्या समाज माध्यमांवर आणि विशेष करून व्हाटसअँप’वर याच भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून एक मेसेज व्हायरल होतं असून त्यामध्ये महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे….कारण मंत्री नवाब मलिक यांनी याच राज्यस्तरीय पोलीस भरती संदर्भात उर्दू भाषेत एक ट्विट केलं असून त्यामध्ये केवळ अल्पसंख्यांक इच्छुक उमेदवारांसाठीच पोलीस भरती पूर्व ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. वास्तविक ते राज्य सरकारमधील जवाबदार मंत्री असून त्यांनी सरसकट सर्वच इच्छुक उमेदवारांसाठी सदर ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. मात्र सरकारी भरती प्रक्रियेत देखील विशिष्ट समाजासाठीच हेतूपुरस्कर अशी योजना देण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

News English Summary: This is because Minister Nawab Malik has sent a tweet in Urdu regarding this state level police recruitment, in which he has said that pre-recruitment training will be given only for the aspiring minority candidates.

News English Title: Minority youths to be trained before Maharashtra Police Recruitment Minister Nawab Malik News Latest Updates.

हॅशटॅग्स

#NawabMalik(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x