22 December 2024 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

डेल्टा प्लसमुळे केंद्राच्या राज्यांना नियमावली कडक करण्याच्या सूचना | आ. भातखळकरांना केंद्राच्या सूचना अमान्य?

MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, २६ जून | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असलं तरी करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे धास्ती वाढली आहे. मागच्या काही दिवसात देशात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील १८ जिल्ह्यांमध्ये करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५० रुग्ण समोर आले आहेत. करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ सुजीत सिंह यांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. त्यांनी देशातील ८ राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आहेत. या ठीकाणी ५० टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस प्रकार चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यांनी जागरुक राहण्याची गरज आहे, तसेच प्रतिबंधावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. या प्रकाराबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश सरकारला २३ जूनला पत्र लिहिले आहे.

भारताव्यतिरिक्त आणखी नऊ देशांत डेल्टा प्लस प्रकार आढळला आहे. अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया येथे ‘डेल्टा प्लस’ प्रकार आढळून आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ राज्यांनी याबाबत खबरदारी सोबत योग्य निर्णय घ्यावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

त्यानुसार महाराष्ट्र सरकारने आरोग्यविषयक सर्व खबरदारी घेत केंद्राच्या सूचनांप्रमाणे निर्बध कडक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना राजकारणापलीकडे काहीच दिसत नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यात सर्वप्रथम नाव येईल ते कायम ट्विटरवर उपलब्ध असणारे आणि केवळ बातम्यांसाठीच ट्विट करणारे आमदार अतुल भातखळकर असेच म्हणावे लागेल. कारण त्यांना केंद्राचे आदेश किंवा सूचना याची देखील पर्वा नसल्याचं पाहायला मिळतंय.

अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्वीट करून केंद्र सरकारच्या सूचनांना देखील पायदळी तुडवलं आहे असंच म्हणावं लागेल. “डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदी राष्ट्र’ बनवी पाहात आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे”, असं अतुल भातखळकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: BJP MLA Atul Bhatkhalkar never value union govt indications regarding Stricken guidelines over Delta Plus variant news updates.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x