विजय औटींना महिला सरपंचानी झापले | आमदार निलेश लंकेविरोधातील टिकेवरून जोरदार निशाणा
मावळेवाडी , ०९ जुलै | संकटाचा सामना करायचा का संकटाला भिऊन घरात बसायचं ? म्हणजे चुकीचं वागा असा याचा अर्थ नाही. मुख्यमंत्री पदोपदी सांगतात मास्क वापरा, हात धुवा, सामाजिक अंतर पाळा. मुख्यमंत्र्यांच्या सुचना पाळायला का अडचण आहे आपल्याला ? नाही ? ‘त्यांच्यातच जाउन झोपन !’ कोणत्याही गोष्टीला एक सिमा असावी. माणसाने वागावं कसं ? तुम्ही अधिक कडक केले असते, प्रशासनाच्या मागे अधिक मजबुतपणे उभे राहिले असता तर काही जिव नक्कीच वाचले असते. मी तपशिलात जाणार नाही. त्यासाठी योग्य वेळ येऊ द्या. मी आमदार असतो तर ५० टक्के जिव नक्कीच वाचविले असते असा दावा करीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मा. आ. विजय औटी यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
मावळेवाडी येथील ३ कोटी ७९ लाख रूपये खर्चाच्या रस्त्याचे औटी यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार औटी पुढे म्हणाले, आपण कशाचं समर्थन करतो आहोत हे सुद्धा समजू नये ? म्हणून कधी कधी मनामध्ये चिड येते. वेदना होतात, त्रास होतो. जे काही चाललंय ते काही योग्य चाललं नाही. अनेक आमदार मला फोन करून सांगतात. तुमचा विश्वास बसणार नाही अशा गोष्टी आहेत. म्हणून असं वाटतं कसं ऐवढं झाल ? ठीक आहे, १८, २०, २२ वर्षांची पोरं बिघडली. ‘ते’ बरं आहे म्हणाले. आजच्या परिस्थितीचा आढावा घ्या, बारकाईने, शांतपणे, त्रयस्तपणे घ्या. चुकलंय असं मान्य करायला लागलेत लोक. आता वेळ निघून गेली आहे. आपण आपल्या मतदारसंघापुरतं बोलतो.पुढचं आपल्याला माहीती नाही.
त्यांना त्यांच चालू ठेवायचंय बिघडवायचंय, मोडायचंय, तोडायचंय का पाडायचंय काय आपल्याला माहीती आहे ? वरच्यांच काय व्हायचं असेल ते होईल. हे सारं दुरूस्त करायचं असेल. तर भविष्य डोळयापुढे ठेऊन येणा-या जि. प., पं. स., नगरपंचायत निवडणूका जिंकायच्या असतील सत्तेचा बॅलन्स साधावा लागेल. ८०, ८२ हजार लोकांनी मला मतदान केलं. त्यांना जि.प. व पंचायत समितीमध्ये दोन दारं कुठेेतरी मी तयार करून दिल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, मा. आ. विजय औटी यांनी स्वतःच्या पतसंस्थेतील कर्मचाऱ्याला वेळेवर मदत केली असती तर त्याचा जिव वाचू शकला असता. त्यांच्या कुटूंबियांचे फोनही न घेणाऱ्या मा.आ. औटी यांनी कोरोना काळात समाजासाठी काय योगदान दिले ? हे एकदाचे सांगावे असे आव्हान टाकळीढोकेश्वरच्या सरपंच अरूणा बाळासाहेब खिलारी व हिवरे कोरडाच्या सरपंच उज्वला दत्ता कोरडे यांनी दिले आहे.
औटी यांच्या पतस्थेतील कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच बगलबच्चाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मदतीची आवष्यकता होती. संकटात सापडलेले त्यांचे कुटूंबिय माजी आमदारांना फोन करीत होते. परंतू त्यांचे फोन स्विकारले गेले नाही. त्यांच्या कुटूंबियांनी आमदार नीलेश लंके यांना फोन केल्यानंतर आ. लंके यांनी राजकिय हेवादावा न पाहता कर्मचाऱ्यासाठी तात्काळ नगर येथे उपचाराची व्यवस्था केली. त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवले. त्या कर्मचाऱ्यास माजी आमदारांनी वेळीच मदत केली असती तर कदाचित त्यांचा जिव वाचू शकला असता. मात्र मदत तर सोडा फोनही न घेतल्याने त्यांना कर्मचाऱ्यांविषयी किती अस्था आहे याचा अनुभव आला. त्याच कर्मचाऱ्याने आपल्या सर्व निवडणूकांमध्ये स्वतःच्या खिशातून खर्च करून तुमच्यासाठी जिवाचे रान केले. किमान ती सहानुभूती तरी त्याच्या जिवनमरणाप्रसंगी दाखवायला हवी होती.
रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आमदारच असावे असा कोठे नियम आहे का ? ज्यांनी कोरोना रूग्णांना मदत केली त्या सर्वांना शासनाने मदत केली. पहिल्या लाटेत तुम्ही एक कोव्हिड सेंटर देखाव्यापुरते सुरू केले. त्यानंतर त्याकडे ढूंकूणही पाहिले नाही. केवळ देखाव्यापुरते नव्हे तर स्वतःचा जिव धोक्यात घालून तरच त्याची समाजाकडून दखल घेतली जाते. समाजाला भाषणबाजीवर भुलविण्याचे दिवस आता गेले आहेत.
आमदार नीलेश लंके यांच्यावर टिका करण्यासाठी आपल्याकडे काहीच राहिलेले नाही. सन २००४ मध्ये आपण आमदार झाले त्यावेळी माजी आमदार कै. वसंतराव झावरे यांच्या काळात पुर्ण झालेल्या दोन्ही कामांचा नारळ फोडण्यासाठी तुम्ही रूसून बसला होतात हे आठवतंय का तुम्हाला ? त्यासाठी पारनेर गावाला तुम्ही वेठीस धरले होते हे देखील स्मरत असेल तर पहा. ती कामे तर कै. झावरे यांच्याच कार्यकाळात पुर्ण झालेली होती तरीही तुमचा अट्टहास का होता ?त्यावेळी तुम्ही हक्कभंगाचीही भाषा वापरली होती. आता तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या कामाला निधी मिळाला आहे याचीही जाणीव ठेवली तर बरे होईल असेही खिलारी व कोरडे यांनी म्हटले आहे.
नीलेश लंके यांनी तालुक्यातील महिलांना देवीचे दर्शन घडविले. त्यामुळेही तुमच्या पोटात गोळा उठला. प्रशासकिय यंत्रणेला हाताशी धरून दर्शनासाठी निघालेल्या गाडया तुम्ही आडविण्यास भाग पाडले. त्या तक्रारी कोणी केल्या होत्या हे तुम्हाला आठवत असेल तर पहा. आमदार असताना अनेक गरजू लोक तुमच्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येत होते. तुम्ही हजारो लोकांना शिफारसपत्र न देता अपमानीत करून घरी पाठविले होते हे देखील तुम्हाला आठवलं तर पहा असा टोला महिला सरपंचांनी लगावला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: MLA Nilesh Lanke Vs Vijay Auti Parner news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today