पत्नीच्या खासदारकीसाठी आणि आनंदराव अडसुळांवर दबाव टाकण्यासाठी पती-पत्नीची राजकीय आरोपांची धडपड?
अमरावती, २३ जून | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्राच्या निर्णयाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अवैध संपत्ती बाळगला असल्याचा आरोप केला आहे. खासदार नवनीत राणा आणि मला शिवसेनेकडून टार्गेट केले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून तशी खिचडी शिजवली जात असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगवेगळ्या देशात अवैध संपत्ती असून त्याची माहिती मी मिळवली आहे. लवकरच ही माहिती ईडीकडे देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार राणा यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले होते. त्याविरोध खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालायाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे.
आनंदराव अडसुळांनी दाखल केली होती याचिका:
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत राणा यांनी अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार आणि तत्कालीन अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याचे म्हटले होते. 2014 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यांच्या जात वैधतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. 2019 मध्ये मात्र या अवैध जात प्रमाणपत्राच्या आधारावरच नवनीत राणा यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या.
या प्रकरणात आता आनंदराव अडसूळ यांच्यावतीने अॅड. कपिल सिब्बल खासदार राणांविरोधात बाजू मांडणार आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देणार किंवा आणखी पुढच्या तारखा मिळणार याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आमदार राणा यांनी मुख्यमंत्र्यांची परदेशात अवैध संपत्ती असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता या कुरघोडीच्या राजकारणात वेगळेच वळण लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: MLA Ravi Rana said Chief Minister Uddhav Thackeray illegal assets proof will give to ED news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO