14 January 2025 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत | आ. रोहित पवार यांची मागणी

MLA Rohit Pawar, Places of worship, temples, Maharashtra

पुणे, १६ ऑगस्ट : अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांनी केलेल्या मागणीचा वाद अजून संपलेला नसतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिस्थळं सुरू करा, अशी मागणी रोहीत पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत असं माझंही म्हणणं आहे. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असं रोहित यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे पर्युषण पर्व काळात मंदिरं खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रं सादर करून मंदिरं खुली करता येणार नसल्याचं म्हटलेलं असतानाच रोहीत पवार यांनी मंदिरे खुली करण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोहित यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

News English Summary: I also say that temples and places of worship should be started for the people. The livelihood of many traders in the area depends on it. People also have religious feelings. I will definitely follow up on that, said Rohit Pawar.

News English Title: MLA Rohit Pawar demand reopen of places of worship temples in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x