15 January 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

मनसे आणि भाजपाची वैचारिक भूमिका सारखीच असल्यास भाजप-मनसे युती शक्य: मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar, MNS and BJP Alliance

मुंबई : २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणारी बातमी पुढे आलीय. गेल्या काही वर्षांपासून भाजपवर तुटून पडणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नवी भूमिका घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती पुढे आलीय. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या वाटचालीत ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जातेय. मुंबईत या दोनही नेत्यांमध्ये दीड तास खलबतं झाली असून त्यात नव्या राजकारणाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे येतेय. त्यामुळे यापुढच्या काळात भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येवून फक्त एक महिनाच पूर्ण झालाय. असं असतानाच राज्याच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या वृत्तानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंची आमच्यासारखीच वैचारिक भूमिका असेल तर भाजप आणि मनसेमध्ये युती शक्य आहे असे संकेत मुनगंटीवार यांनी दिले आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका मवाळ करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन शिवसेनेच्या मतांमध्ये खिंडार पाडण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

मात्र शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने आता मनसेसाठी आपला राजकीय अवकाश मिळवण्याचं आव्हान आहे. म्हणूनच भाजपच्या मदतीने आपली जागा मिळवण्याच्या पर्यायावर मनसे विचार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title:  MNS and BJP alliance is possible says BJP Leader Sudhir Mungantiwar.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x