24 December 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

राज ठाकरेंच्या पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असे म्हणणे बालिशपणाचे होईल - महापौर

Halfkin corona vaccine

मुंबई, १७ एप्रिल: राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दरम्यान राज्यात लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला. यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहिम पुर्ववत व्हावी यासाठी केंद्र सरकारने मुंबईतील हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिली. मात्र, आता त्यावरुन आता शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हाफकिन संस्थेला भेट देत तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यासोबतच त्यांनी हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी केंद्राकडे केली. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही केंद्र सरकारला पत्र लिहित ही मागणी केली होती. यानंतर नुकतीच केंद्राकडून ही परवानगी मिळाली आहे.

यासंदर्भात संदीप देशपांडे म्हणाले की, ‘राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”.करोना काळात “राजकारण” नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती.’ यानंतर नवा वाद सुरू झाला आहे.

तर संदीप देशपांडे असे म्हणाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना उत्तर दिले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत पत्रव्यवहार करत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रव्यवहार केला आणि हे सर्व महाराष्ट्रासाठी व मुंबईसाठी चांगलेच झाले. मात्र राज ठाकरेंच्या पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असे म्हणणे बालिश होईल.

 

News English Summary: The Corona situation in the state is critical. Meanwhile, there was a shortage of vaccine in the state. After this, there was a dispute between the central government and the state government. In this context, the Central Government has given permission to the Halfkin Institute in Mumbai to manufacture vaccines so that the re-vaccination campaign in the state can be resumed. However, it has now started a battle of credentials between Shiv Sena and MNS.

News English Title: MNS and Shivsena over permission to Halfkin for vaccine production news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x