11 January 2025 3:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

गडकिल्ल्यांना हात लावाल तर परिणाम दिसतील: राज ठाकरे

CM Devendra Fadnavis, Raj Thackeray, Fort, Chatrapati Shivaji Maharaj

मुंबई : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या सर्व प्रकरणावरून राज्याच्या पर्यटन विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. पर्यटन विभागाचे सचिव विनिता सिंगल यांनी ‘राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग १ आणि दुसरे वर्ग २ . महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे ३०० किल्ले हे वर्ग २ मध्ये येतात.

मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण जाहीर करताच या निर्णयावर चारही बाजूंनी टीकेची झोड उठविण्यात आली. त्यातच शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सरकारच्या भूमिकेवर डोंबिवलीत सडकून टीका केली. गडकिल्ल्यांना हात लावाल तर परिणाम दिसतील, असा गंभीर इशारा सरकारला देतानाच, सरकारला उत्पन्नच मिळवायचे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, त्यातून चांगले पैसे मिळतील, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला.

महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे, मात्र सरकारला याचे काहीच देणेघेणे नाही. भाजप मशीनमध्ये हेराफेरी करून निवडून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावनेबाबत त्यांना काही वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे आयोजन केले असून याचाच एक भाग म्हणून त्यांनी शनिवारी कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे नियोजन केले होते. मात्र दुपारी वाहतूककोंडीत अडकल्याने बैठक रद्द करण्यात आली असून आज रविवारी ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x