8 January 2025 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

भाजप-शिवसेना सरकार असताना संभाजीनगर का केलं नाही? - राज ठाकरे

MNS Chief Raj Thackeray, Aurangabad, Sambhajinagar, Shivsena BJP

मुंबई, ०६ फेब्रुवारी: औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. भाजप आणि मनसेनं आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. जेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा का नामकरण केलं नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

या मुद्द्यावर बोलाताना राज ठाकरे म्हणाले, एकूणच या सर्व प्रकरणात भाजपा असेल किंवा शिवसेना ज्यावेळी केंद्रात व राज्यात अशआ दोन्ही ठिकाणी सत्ता होती, त्यावेळी हे नामांतर का नाही झालं? आज तुम्ही कसंल राजकारण करत आहात? इतर अनेक शहरांची नावं बदलल्या गेली. दिल्लीत रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात व राज्यात तुमचंच सरकार होतं. तर त्यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? याचं उत्तर भाजपा व शिवसेनेनं द्यावं. लोकांना काय वेडं समजतात का? निवडणुकीच्या तोंडावर बरोबर संभाजीनगरचा विषय आणला जातो. इतकी वर्ष का नाही केलं? थांबवणारं कुणीच नव्हतं.

दरम्यान, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ असं करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मनसे कार्यक्रर्त्यांनी गुरुवारी घेराव घातला. त्याचवेळी मनसे सैनिकांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रकं खैरे यांच्या अंगावर फेकून दिली. यावेळी मनसे सैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी,’ आणि ‘धिक्कार असो, धिक्कार असो, राज्य सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या होत्या.

 

News English Summary: The issue of naming Aurangabad city as Sambhajinagar is currently being politicized. BJP and MNS have taken an aggressive stance and started an agitation to name Aurangabad as Sambhajinagar. In such a situation, MNS president Raj Thackeray has strongly targeted BJP and Shiv Sena. When there was a BJP-Shiv Sena government at the Center and in the state, why was it not named? This question has been asked by Raj Thackeray.

News English Title: MNS Chief Raj Thackeray criticised BJP and Shivsena over Aurangabad renaming to Sambhajinagar issue news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x