महाराष्ट्रात कोरोना का वाढला? | राज ठाकरे यांनी सांगितली ही कारणं
मुंबई, ६ एप्रिल: महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,288 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण येण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत एका दिवसांत 50,329 नवे रुग्ण आढळले आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात सर्वात वर असून जगातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.
रात्रीला संचारबंदी आणि संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. राज्यात लागू असलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु असूनदेखील कोरोना प्रकरणामध्ये घट येत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला अधिक कठोर पाऊल उचलण्यास सांगितले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर आज पत्रकार परिषद घेतली. बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले. राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे, असंही ते म्हणाले.
राज्यात पेशंटची संख्या वाढत आहे. आधी पेक्षा ही लाट सर्वाधिक मोठी आहे. महाराष्ट्रातच कोरोनाची सर्वात मोठी लाट का आहे? असं मुख्यमंत्र्यांना मी विचारलं. परंतु याबाबतच्या खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. त्यामुळे बाहेरचे लोक येत असतात. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होतात, शेतकऱ्यांचे मोर्चेही सुरू आहे. तिथे कोरोनाची लाटबिट नाही. फक्त महाराष्ट्रातच आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
News English Summary: Raj Thackeray held a press conference today after an online meeting with Chief Minister Uddhav Thackeray. The corona grew because of people coming from outside the state and their untested. Also, corona patients are not tested in other states. Therefore, the number of patients in that state is not known.
News English Title: MNS chief Raj Thackeray talked on reason behind corona second wave news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो