20 April 2025 3:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

विधानसभा २०१९: राज ठाकरे त्यांच्या राजकीय रणनीतीत बदल करतील का? सविस्तर

MNS, Raj Thackeray, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यात भाजपने देशभर मुसंडी घेत बहुमताने सत्ता काबीज केली. मात्र राज्यात बोलायचे झाल्यास इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तगडे विरोधी पक्ष असताना देखील, भाजप आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींनी प्रत्यक्ष निवडणूक निकाल लागताच मनसेवरच शेरेबाजी करत प्रतिक्रिया दिली आणि हाच मनसेचा विरोधी पक्ष म्हणून नैतिक विजय आहे. वास्तविक भाजपाला मिळालेलं यश हे देशभरातील सर्वच विरोधी पक्षांच्या विरोधातील आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर ‘लाव रे तो व्हिडिओ’ असा प्रयोग कोणत्याही विरोधी पक्षाने केला नव्हता. मात्र राज ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेस उमेदवारांच्या २०१४ मधील मतांच्या तुलनेत मोठी वाढ झाली, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीने दुसऱ्याबाजूने काँग्रेसची मतं खाल्ली आणि तिथेच काँग्रेस राष्ट्रवादीचं गणित बिघडल्याचे पाहायला मिळाले.

मात्र ‘लाव रे तो व्हिडिओ’च यश तेव्हाच अधोरेखित झालं जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभा प्रसार माध्यमांवर पूर्ण पणे झाकल्या गेल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला बसणार फटका काही प्रमाणात कमी झाला. दरम्यान केंद्रातील भाजपच्या नेत्यांमध्ये अरुण जेटली आणि पियुष गोयल आणि एका मुलाखतीत स्वतः मोदींना राज ठाकरे यांच्या प्रचार तंत्रावर प्रतिक्रिया देणं भाग पडलं. त्यात राज्यात मुख्यमंत्र्यांपासून ते संपूर्ण राज्य भाजप राज ठाकरे यांच्यावरच केंद्रित झाल्याचं पाहायला मिळालं. प्रत्यक्ष निवडणूक न लढवता सत्ताधाऱ्यांचा त्यांनी चांगलाच घाम काढल्याचे पाहायला मिळाले. त्यात निकालानंतर देखील भाजप आणि शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया मनसेवरच दिली आणि ‘लाव रे तो व्हिडिओ’ फेल गेल्याची बोंब सुरु केली. मात्र हे ‘व्हिडिओ’ एक मोठं अस्त्र आहे, जे त्यांनी पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीत प्रभावीपणे वापरणं महत्वाचं आहे. कारण लोकसभेत त्यांचे उमेदवार नव्हते, पण विधानसभेत त्यांचे प्रत्यक्ष उमेदवार असतील आणि त्याला मनसेने इतर अभियानाची देखील जोड देणं गरजेचं आहे.

प्रत्यक्ष विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमाणे प्रभावी यंत्रणा आणि खाजगी एजन्सीच्या माध्यमातून तंत्रज्ञान वापरून प्रतिदिन मैदानावरील कामाचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. केवळ सभांनी मतं मिळत नाही हे मनसेने आधी स्वीकारलं पाहिजे. किंबहुना मनसेत इतर राजकीय सल्लागार आणि त्यांनी दिलेल्या सूचना यांना किती महत्व आहे हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. त्यामुळेच विविध स्वरूपातील सार्वधिक होकाराम्तक कन्टेन्ट असून देखील मनसे नापास होते आणि त्याचं मूळ कारण इथे शुभचिंतकांच्या मैत्रीपूर्ण सल्ल्याला देखील ‘आम्हाला राजकारण शिकवूं नका’ अशा विचारातूनच घेतलं जात असावं. तसेच ज्यांच्या सल्ल्याने आधीचे प्रयोग फसले, त्यांच्यावरच पुन्हा पुढची जवाबदारी टाकत राहणे हे देखील मुख्य कारण असावं. त्यात जाहिरात हा केवळ निवडणुकांपुरताच विषय नसतो तर तो एका विशिष्ट कालावधीत सुरु असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये प्रिंट मीडिया वगळून पुढील ६-७ महिने इतर ऑनलाईन मार्केटिंगचे प्रयोग चिरंतर सुरु ठेवणे गरजेचे आहे, कारण प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यावर वेळ खूप कमी असतो आणि सर्वच पक्ष त्यात उतरतात.

राज ठाकरे यांनी विधानसभेत देखील ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे प्रभावी अस्त्र नियोजनबद्ध वापरून विरोधकांची पोलखोल करताना, त्यासोबतच भाजप आणि शिवसेनेच्या २०१४ मधील जाहीरनाम्याची, तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसासाठी आणि शेतकरी व कामगारवर्गासाठी केलेली समाजसेवेची कामं देखील व्हिडिओ स्वरूपात दाखवणं गरजेचं आहे, त्यामुळे सत्ताधार्यांच्या फसव्या जाहीरनाम्याची पोलखोल करताना, मनसे पक्ष सत्तेत नसून देखील सामान्य लोकांच्या कामी येतो हा संदेश मतदारांपर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण राज ठाकरे हे केवळ बोलघेवडे आहेत हा विरोधकांचा रडीचा डाव उलथून लावणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या समाजपयोगी कामाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर असले तरी ते राज्यातील जनतेपर्यंत पोहोचतातच असं नाही. त्यामुळे ‘बोलावं रे त्यांना स्टेजवर’ म्हणत त्या सामान्य माणसाला देखील मंचावर उपस्थित करून मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली प्रत्यक्ष मदत मतदारांपर्यंत त्यांच्या तोंडूनच सांगणे गरजेचे आहे.

राज ठाकरेंच्या मनसेकडून विकासाभिमुख असा जाहीरनामा आधीच प्रसिद्ध होणं गरजेचं आहे, ज्यामध्ये समाजातील सर्वच घटकांचा फायदा असेल. मल्टिप्लेक्स, फेरीवाले अशा संदर्भात थेट आंदोलन छेडण्यापेक्षा आम्ही सत्तेत आल्यावर याविषयावर जनतेला काय देऊ आणि फेरीवाला कायद्यात शेतकऱ्यांसाठी काही कायदेशीर तरतूद करता येईल का याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील आगरी, कोळी आणि आदिवासी समाजासाठी जाहीरनाम्यात ठोस भूमिका मांडणं गरजेचं आहे. तसेच जाहीरनाम्यात काही ठोस आश्वासनं देणं देखील काळाची गरज आहे. स्वतःची राजकारणातील बार्गेनिंग पावर वाढविण्यासाठी इतर विरोधी पक्षांच्या सहज भेटीगाठी घेणं टाळावं. राजकारणात सर्व शक्य असतं आणि कोणीही कोणाचा कायमचा शत्रू असं म्हटलं तरी, आणि राज ठाकरे यांनी विचार देखील केला नसेल असे धक्कादायक प्रयोग यशस्वी होतात का ते तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी मनसेने केवळ आणि केवळ स्वतःच्या पक्षाच्या हिताचे आणि स्वार्थाचे प्रयोग करणे गरजेचे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या