15 November 2024 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

मुख्यमंत्र्यांच्या मास्कवरील टीकेला मनसे Facebook LIVE वरून प्रतिउत्तर देणार

MNS leader Sandeep Deshpande, Shivsena, Facebook Live

मुंबई, ३ एप्रिल: राज्यातील कोरोनस्थिती बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस खळवणाऱ्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “मास्क न वापरण्यात काय शौर्य आहे?”, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

राज ठाकरे हे मास्क वापरत नाहीत. एका कार्यक्रमात याविषयी एका पत्रकाराने राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता, “मी मास्क वापरतच नाही” असे उत्तर राज ठाकरेंनी दिले. त्यावेळी राज यांच्या या उत्तराची मोठी चर्चाही झाली. याचवरून मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “काही लोक म्हणतात ‘मी मास्क लावत नाही. मास्क न वापरण्यात काय शूरता आहे काय ?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

दरम्यान, याच विषयावरून मनसेकडून शिवसेनेला प्रतिउउतर देण्यात येणार आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रतिऊत्तर देणार आहेत. ”मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.”, असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी 11 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सूचवलं आहे.

 

News English Summary: This time, while appealing to the citizens to follow the rules, Chief Minister Uddhav Thackeray has targeted MNS president Raj Thackeray without naming him. “What is the bravery in not wearing a mask?”, The Chief Minister targeted Raj Thackeray.

News English Title: MNS leader Sandeep Deshpande will answer to Shivsena over Facebook Live news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x