21 November 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

ग्रामपंचायतीतही 'शिल्लक' न राहिलेल्या मनसेचे पदाधिकारी अजूनही पक्षकार्यापेक्षा शिवसेनेला टोमणे मारण्यात व्यस्त?

MNS Leaders Gajanan Kale

MNS Gajanan Kale​​​​​​ | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची संमतीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याशी अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी चर्चा केली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची प्रथा ही ठाकरेंचीच आहे.

त्यामुळे शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच झाला पाहिजे. आपल्याला संमती मिळो किंवा न मिळो शिवसैनिकांनी शिवाजी पार्क मैदानात जाव त्याचा त्याचा ताबा घ्यावा आणि मेळावा घ्यावा असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. ज्यामुळे त्यांनी एक प्रकारे शिंदे सरकारला ओपन चॅलेंजच दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे ग्रामपंचायत निकालात मनसे कुठे दिसतेय का अशी दिवसभर आस लावून बसलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मनसे शिल्लक असल्याचं पाहायला मिळालं नाही. स्वतःचा पक्ष विस्तार सोडून शिवसेनवर ‘ट्विटर टोमणे’ मारून बातम्यांमध्ये राहणं हाच उद्योग राहिल्याचं पाहायला मिळतंय. मनसेचं ग्रामपंचायत निवडणुकीत नेमकं काय झालं यासाठी प्रवक्ते समोर आले नसले तरी, मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय.. मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर”टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी.. खंजीर, वाघनखं,गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये तसंही यावेळची स्क्रिप्ट बारामतीहून येणार आहे असा खोचक टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावलाय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Leaders Gajanan Kale on Shivsena Dasara Melava check details 20 September 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x