22 February 2025 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

एक आमदार पाठपुरावा दमदार | कल्याणमधील काही रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर | मनसे आमदाराकडून जाहीर आभार

MNS Chief Raj Thackeray

कल्याण, १२ मे | काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीतील विकास कामांसाठी निधी मिळाला यासाठी पाठपुरावा केला होता. त्यावेळी ‘प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो, तसेच एखाद्या जवळच्या राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या रस्त्याला निधी देतो’असा शब्द त्यांनी दिला होता, तो पूर्ण केला असं स्वतः मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं होतं. यासाठी गडकरींच्या केंद्रीय परिवहन खात्याने तब्बल ४८ कोटी ६१ लाखाचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे मनसेने देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जाहीर आभार मानले आहेत.

आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याणमधील काही रस्त्यांच्या विकास कामांसाठी राज्य सरकारच्या अखत्यारीतील ग्रामीणविकास मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला देखील यश आलं आहे. कल्याण ग्रामीण मतदार संघातील ३०५४/२५१५ लेखाशिर्ष अंतर्गत काही रस्त्यांच्या कामांना १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत स्वतः मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी माहिती देताना म्हटलं आहे की, “ग्रामविकास मंत्री मा. ना.हसन मुश्रीफ साहेब यांना कल्याण ग्रामीण मतदार संघातील ३०५४/२५१५ लेखाशिर्ष अंतर्गत काही रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती, त्यासाठी १ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल हसन मुश्रीफ साहेबांचे मनापासून धन्यवाद !”.

 

News English Summary: MNS MLA Raju Patil’s follow-up to the Rural Development Ministry under the state government for some road development works in Kalyan has also been successful. 1 crore has been sanctioned for some road works under 3054/2515 account head in Kalyan rural constituency.

News English Title: MNS MLA Raju Patil gave thanks to minister Hasan Mushrif for approval of fund for Kalyan Road news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x