22 February 2025 7:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करा - आ. राजू पाटील

MNS MLA Raju Patil, buses at a discounted rate, Konkan Ganeshotsav

मुंबई , १३ जुलै : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चारकमान्यांना कोकणात जाण्यासाठी वाहतूक सुविधा अद्यापही उपलब्ध नाही. चाकरमन्यांनी कोकणात कसं जावं हा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच, गणेशोत्सवात कोकणबंदी होण्याची भितीही व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे या मुद्द्यावरूनही राजकारणही तापलं आहे. या प्रश्नात आता मनसेने उडी घेतली असून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सरकारनं सवलतीच्या दरात बस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात गावी जाण्यासाठी खासगी बस ट्रॅव्हल्सकडून अव्वाच्या सव्वा रुपये उकळले जात आहेत. त्यामुळे सरकारनं गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करुन द्याव्यात तसंच, कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास त्यांना या कठीण काळात दिलासा मिळेल. असं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या वाढच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी म्हणून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.

आज पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेत, हा निर्णय घोषित केला. या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र, किराणा माल आणि भाजी विक्री बंद राहणार आहे. त्यामुळं जिल्ह्यात कोरोनाचा हा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

News English Summary: Fear of Konkan ban is also expressed during Ganeshotsav. Therefore, politics is also hot on this issue. MNS MLA Raju Patil has demanded that the government should provide buses at a discounted rate for those going to Konkan for Ganeshotsav.

News English Title: MNS MLA Raju Patil has demanded that the government should provide buses at a discounted rate for Konkan for Ganeshotsav News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x