19 January 2025 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Tax Slab | वार्षिक पगार 15 लाख तरीही जुनी टैक्स प्रणाली सर्वोत्तम, नवीन टॅक्स स्लॅब कोणासाठी फायदेशीर जाणून घ्या IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA
x

KDMC - त्या ७ गावांतील कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय द्यावं, आ. राजू पाटील यांची मागणी

MLA Raju Patil, KDMC, Covid 19

कल्याण-डोंबिवली, ११ मे: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या निळजे, घेसर, नांदिवली, गोळ्वली, हेदुटणे, काटई, कोळेगाव या ७ महसुली गावांना जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केवळ आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु सद्यस्थितीत या ७ महसुली गावांची कर वसुली कल्याण डोंबिवली महानगरपालिका करीत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आजदे अंतर्गत येणाऱ्या घरीवली, संदीप, मानपाडा, सोनारपाडा, दावडी या गावांची आरोग्यसेवा यापूर्वीच कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे.

परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या गावांची आरोग्य सेवा वर्ग न केल्यामुळे या ७ गावातील रुग्णांना तसेच सहवासितांना महानगरपालिकेमार्फत रुग्णालयात किंवा टाटा आमंत्रण सेंटर मध्ये दाखल करून घेतले जात नाही. या रुग्णांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात जावे लागते त्यामुळे वेळ लागत असून मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच अनुषंगाने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

केवळ तांत्रिक कारणांमुळे महापालिकेतच असलेल्या परंतु निळजे आरोग्य केंद्रात येणाऱ्या या ७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. लोढा, पलावा, रिजन्सी, रुणवाल अशा मेगाप्रोजेक्टसह अनेक रहिवासी संकुलामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे. एवढया मोठ्या लोकसंख्येसाठी बदलापूर येथे केवळ १५ रूम देण्यात आल्या असून सध्याच्या परिस्थितीत त्याही कमी पडत आहेत, त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचं आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत येणाऱ्या ७ महसुली गावांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय व सध्या कार्यरत असलेल्या टाटा आमंत्रण सेंटरमध्ये कोरोनाबाधित सहवासितांना दाखल करून घेण्यासाठी संबंधिततांना आदेश द्यावेत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या ७ गावांची आरोग्यसेवा कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात यावी, यासंदर्भात आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे यांनी दिनांक २४/२/२०२० रोजी सहसंचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांच्याकडे जो प्रस्ताव पाठविला आहे त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची विनंती आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

News English Title: MNS MLA Raju Patil meet Thane collector regarding KDMC covid 19 patients issue News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x