तर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मनसे खेळीने सेना-राष्ट्रवादीतच जुंपेल? सविस्तर

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यात औरंगाबाद शहर दौरा केंद्रस्थानी आहे. राज ठाकरे उद्या औरंगाबादला पोहोचणार असले तरी मनसेचे आमदार राजू पाटील आणि नेते अभिजित पानसे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी एकदिवस आधीच औरंगाबादला दाखल झाले आहेत.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी जाहीर मागणी केली आहे. शिवसेनेची मागील दोन दशकांहून ही मागणी सरकार असताना देखील पूर्ण झालेली नाही. याच मुद्द्यावरुन शिवसेनेने अनेकदा औरंगाबादमधील राजकारण केलं आहे. मात्र राजू पाटील यांनी याच मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार निशाणा साधत जिल्ह्याच्या नामांतरणाची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत अभिजित पानसेही उपस्थित होते.
बऱ्याच काळापासून केंद्रात आणि राज्यातही शिवसेना सत्तेत होती. मात्र या नामांतरणावरुन केवळ राजकारण करण्यात आलं. कुठलाही आवाज उठवला नाही किंवा ठोस भूमिका घेतली नाही. जिल्ह्याचं नाव बदलायला केंद्राकडून मंजूरी लागते. मात्र तशी मागणी राज्य शासनाने केली पाहिजे. यावेळेस शिवसेनेकडून लोकांना काहीच अपेक्षा नाहीत. मात्र मनसे राज्य सरकारला जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर असं करण्यास भाग पाडणार आहे,” असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
एकाबाजूला मनसेने यावर आक्रमक पावित्रा घेतलेला असताना शिवसेना मात्र कात्रीत सापडण्याची चिन्हं आहेत. कारण एक वास्तव आहे की केंद्रात (युती असताना) आणि राज्यात सत्तेत असताना, तसेच औरंगाबाद महानगरपालिका, स्थानिक आमदार तसेच खासदार शिवसेनेचेच असताना उद्धव ठाकरे यांनी केवळ राजकारण केलं अशी धारणा शहरात निर्माण झाली आहे. त्यात आता शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने, केंद्रातून या विषयाचा मार्ग अवघड झाला आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष अल्पसंख्यांकांचा रोष ओढावू नये म्हणून राज्यातून देखील तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यासाठी विरोध करतील अशीच शक्यता आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी २०१३ मधील राष्टवादी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलने औरंगजेब चित्रपटावरून केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅनरवरील मजकुरात औरंगजेबाचा उल्लेख ‘सूफी संत’ असा केल्याची आठवण करून दिली आहे. त्यावरील मजकुरात ‘आम्ही सूफी संत आलमगीर बादशाह औरंगजेबचा अपमान किंवा प्रयत्न सहन करणार नाही’. ‘आगामी हिंदी चित्रपट’ औरंगजेब ‘चे शीर्षक बदलले पाहिजे आणि चित्रपटातील वादग्रस्त विधानेही हटविण्यात यावीत’, अशीही बॅनरवर मजकूर लिहून आंदोलन केल्याची आठवण जयप्रकाश बाविस्कर यांनी करून दिली आहे.
छत्रपतींच्या महाराष्ट्रात औरंगजेबाला संत मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस ला आमची हिंदवी स्वराज्याची भूमिका पटेल तरी कशी ! @PawarSpeaks @mnsadhikrut @SandeepDadarMNS @anilshidore @GajananKaleMNS @BalaNandgaonkar @rajupatilmanase @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT pic.twitter.com/93K5d7o1Eg
— Jayprakash Baviskar (@JPBaviskarMNS) February 12, 2020
त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना मोठ्या राजकीय कचाट्यात अडकण्याची चिन्हं आहेत. तसेच मनसेने आगामी औरंगाबाद निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलेच सूतोवाच केले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी’सोबत असल्याने शिवसेनेनेला एमआयएम’च्या मुस्लिम नेत्यांवर देखील धर्मावरून विखारी टीका करता येणार नाही. त्यात तिथेही आघाडी झाल्यास शिवसेनेसाठी सर्वच कठीण होण्याची शक्यता आहे. कारण एमआयएम आणि माणसे एकमेकांना टोकाच्या भूमिका घेऊन लक्ष करतील आणि त्यातून संपूर्ण निवडणूक मनसे-एमआयएम केंद्रित होऊन मनसेला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केल्यास मोठ्या प्रमाणावर हिंदू मतदार मनसेकडे वर्ग होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा मुद्दा तापणार हे निश्चित आहे.
News English Summery: While the MNS has taken aggressive stance on it, Shiv Sena is a sign of scandal. It is a fact that in the city (in the alliance) and in the state, while the Aurangabad Municipal Corporation, local MLAs and MPs belong to the Shiv Sena, it is believed that Uddhav Thackeray has done politics only in the city. Now, with the Shiv Sena breaking the alliance with the BJP and taking the lead with the Congress-NCP, the path to this issue has become difficult from the center. It is likely that the Congress-NCP will oppose sending such proposal from the state to the Center so as not to incite the minority. Notably, MNS leader Jayaprakash Baviskar has recalled the agitation made by Aurangzeb movie by a minority cell of the NCP in 2013.
Web Title: MNS over changing name of Aurangabad city to Sambhajinagar.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल