सांगली: पूरग्रस्त दुर्गम भागात मनसेकडून औषधांचा पुरवठा
मुंबई : निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. इतके की, अनेक वर्षांनी महापूर आला. भयावह पूरसदृश परिस्थिती महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली, पण इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहरांना जोडणारे अनेक महामार्ग तसेच गावाकडे जाणारे छोटेछोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, त्यामुळे दररोज या रस्त्यावर धावणारी लोकवाहिनीही ठप्प झाली.
राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ कोल्हापूर, सांगली भागात सुरू आहे. अशा वेळी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यापर्यंतच्या लोकांना मदत मिळावी यासाठी राजकीय पक्षदेखील प्रयत्नशील आहेत. मनसेनेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला असून कोणीही न पोचलेल्या अशा सांगली जिल्ह्यातील शिये गाव, नागदेववाडी, माळवाडी, आंबेवाडी, चिखली, जयसिंगपूर येथील शिरोळ, नृहसिंगवाडी येथील गावात मनसेने मदत पोहोचवली आहे. तेथील ग्रामस्थांची चौकशी करत मनसेतर्फे सहाय्य करण्यात आले असून सांगली येथील औषधाच्या मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा करण्यात आला आहे.
साधारण ५००० लीटर पाणी, ५००० फेस मास्क, ३५०० ORS रेडीमिक्स ड्रिंक, ५००० सेनेटरी नॅपकिन्स, ५०० बेबी डायपर पॅंन्टस, बॅबी फूड(मिल्क पावडर,सेरेलॅक इत्यादी), ५००० हजार व्यक्तिंना उपयोगी पडतील इतके अँटीबायोटिक औषधे, ओआरएस आणि बालरूग्णांसाठी पॅरासिटेमॉल सिरप, पोटभर मिळेल त्यावर काही दिवस पुरेल इतकी रसद आणि इतर जीवनावश्यक वस्तू या ग्रामस्थांना मनसेकडून पुरवण्यात आल्या आहे.
दरम्यान, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पूरग्रस्त महिलांसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या आहेत. यामध्ये साड्या, गाऊन, पेटिकोट, अंतर्वस्त्रे आणि सॅनिटरी नॅपकिन्स यांचा समावेश आहे”. लोकांकडून मदत घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“पूरग्रस्त भागातील महिलांना मासिक पाळीच्या दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत नसल्याचं समाजमाध्यमांतून अनेकांनी सांगितलं आहे. म्हणूनच आम्ही पूरग्रस्त गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसुद्धा पाठवत आहोत. नागरिकांनीही सॅनिटरी नॅपकिनची पाकिटं आमच्यापर्यंत पोहोचवावीत”, असं आवाहन शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL