पंढरपूर पोटनिवडणूक | राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा | भाजपविरोधात प्रचारही करणार
पंढरपूर, ११ एप्रिल: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 8 एप्रिलपासून दिवसभर सभांचा धडाका लावला होता. त्यानंतर रात्री पंढरपूरमध्ये काही राजकीय गोळाबेरीज करणाऱ्या भेटी घेतल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य समन्वयक आणि शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जात अजित पवार यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याची दुसरी खेळी अजित पवार यांनी केली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जमले होते. आज त्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहायला मिळतंय.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पाठिंबा देऊ केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे आणखी जड झाले आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भारतीय जनता पक्षाने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंढरपूरमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. कोरोनामुळे राज्यावर लॉकडाऊनचे ढग दाटले असतानाही पंढरपुरात सभा घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपूरात सभा घेतल्या होत्या.
News English Summary: Maharashtra Navnirman Sena (MNS) has backed NCP’s Bhagirath Bhalke in the by-elections of the prestigious Pandharpur-Mangalwedha Assembly constituency held by NCP and Bharatiya Janata Party. This information was given by Dilip Dhotre, Secretary of State, Maharashtra Navnirman Sena.
News English Title: MNS party supported to NCP candidate Bhagirath Bhalke for Pandharpur Mangalvedha By poll election news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO