22 December 2024 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसेकडून विनामूल्य कोविशिल्डचे डोस

Raj Thackeray

मुंबई , १३ जून | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस सोमवार १४ जून २०२१ रोजी आहे. या निमित्ताने मनसेच्यावतीने परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. यासाठी होणारा सर्व खर्च मनसे करत आहे. मोफत लसीकरण कार्यक्रमासाठी उद्योजक नितीन नायक, निलेशकुमार प्रजापती, उजाला यादव, विजय जैन यांनी मोलाची मदत दिली आहे.

मनसेच्यावतीने सोमवार १४ जून रोजी १८ ते ४४ या वयोगटातील निवडक नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाईल. या लसीकरणासाठी नागरिकांनी शिवडी विधानसभा मनसे गडावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांनाच सोमवारी १४ जून रोजी वाडिया हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. वाडिया हॉस्पिटलमध्ये सोमवारी लसीकरण केंद्राचे उद्घाटन मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे, असेही पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले.

दरवर्षी १४ जून रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षाच्यावतीने सामाजिक उपक्रम राबवले जातात. वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, अन्न धान्य वाटप, वैदकीय शिबीर, विद्यार्थी दत्तक योजना, शालेय साहित्य वाटप, गरजूंना छत्री व रेनकोट वाटप असे उपक्रम राबवले जातात. यंदा यापेक्षा वेगळा पण सध्याच्या काळात महत्त्वाचा असलेला असा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

News Title: MNS party will give free Vaccination in Mumbai on the occasion of MNS Chief Raj Thackeray’s birthday news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x