12 January 2025 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 99% प्रवाशांना ठाऊक नाही रेल्वे तिकीट बुकिंगची ही ट्रिक, स्लीपर तिकिटाच्या पैशांत AC प्रवास करू शकाल EPFO Minimum Pension | खाजगी पेन्शनधारकांना दरमहा किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार, महत्वाची अपडेट आली Bank Account Alert | बँक बचत खात्यात 'या' पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू नका, केला तर इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Business Idea | महिला आणि तरुण सुद्धा घरातून सुरु करू शकतात 'हा' डिमांडिंग व्यवसाय, महिना लाखोत कमाई होईल Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
x

PMC बँक: महाराष्ट्र सैनिकांचे रम्यालाच डोस; आम्ही बुवा ऍक्सिस बँकेत ठेवतो; वाहिनीसाहेब आहेत ना

AXIS Bank, BJP Ramya, MNS Workers, BJP Maharashtra, Raj Thackeray

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे समजताच भारतीय जनता पक्षाच्या रम्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भयंकर चिंता सतावत असल्याचं दिसत आहे. राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांनी तोंड वर काढलेलं असताना रम्या सरकारला डोस देण्याऐवजी राज ठाकरे यांच्या नावाचाच जाप करत असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रातील १०० ते १५० जागांवर मनसे आपले उमेदवार उभे करणार आहे. मात्र निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याआधीच भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. भाजपनेही समाज माध्यमांचा वापर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मोठं कँपेन सुरू केलं केल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी आणि त्यांना डोस पाजण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘रम्याचे डोस’ सुरू केले. मात्र भाजपच्या या रम्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच लक्ष केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर ईडीची चौकशी लागली असून कोहिनूर मिल प्रकरणी त्यांना ‘कोट्याधीश जादूगार’ म्हणत टि्वट केलं आहे. असं असलं तरी भाजपच्या रम्याने मुंबईने भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या मिल खरेदीच्या जादूकडे कानाडोळा केल्याचे पाहायला मिळत असून, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आणि महिलांविषयक मुद्यांवर रम्याकडे सरकारसाठी कोणतेही ‘डोस’ नसल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र त्याला महाराष्ट्र सैनिकांनी चांगलंच प्रतिउत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सैनिकांनी त्यावरून ‘रम्यालाच डोस’ असं अभियान सुरु केलं आहे. कालच PMC बँकेवर आरबीआय’ने निर्बंध घातल्याने अनेक सामान्य लोकांचे पैसे एकप्रकारे सील झाल्याचे पाहायला मिळाले आणि बँकेत सामान्य ग्राहकांनी मोठा रोष व्यक्त केला. अनेकांनी टाहो फोडत आपण रस्त्यावर आल्याचं सांगत दुःख व्यक्त केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. त्यालाच अनुसरून महाराष्ट्र सैनिकांनी भाजपच्या रम्यालाच डोस देऊन प्रश्न विचारून तोंडघशी पाडलं आहे. अमृता फडणवीस कार्यरत असलेल्या ऍक्सिस बँकेचा दाखला देत महाराष्ट्र सैनिकांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x