7 January 2025 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK IRFC Share Price | 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला IRFC शेअर, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Penny Stocks | 6 रुपयाचा पेनी शेअर खरेदीसाठी गर्दी, सुसाट वेगात कमाई, यापूर्वी 776% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

शिंदेंची वाचून भाषण करण्याची शैली खेळ बिघडवणार हे ध्यानात येताच भाजपने रचली 'शिंदे-मनसेच्या तारा' जुळवण्याची स्क्रिप्ट

Raj Thackeray

MNS Shinde Camp Alliance | शिंदे गटाच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याने भाजपसमोरील आगामी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सभेदरम्यान लोकांना खिळवून ठेवण्याची भाषण शैली नाही हे भाजपासमोर स्पष्ट झालं आणि त्यात एका स्थिर सभेत शिंदेंना संपूर्ण भाषण वाचून करावं लागल्याने ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारावेळी एकामागून एक धावत्या सभांमध्ये शिंदे काय गोंधळ घालतील याची प्रचिती भाजपच्या नेत्यांना आली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सभांमधून लोकांना खिळवून ठेवणं अत्यंत गरजेचं असेल आणि त्यासाठी शिंदे-मनसेत ‘राजकीय तारा’ जोडण्याचं निश्चित झाल्याचं भाजपातील महत्वाच्या नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

मुंबईसह, पुणे, नाशिक आणि अनेक महत्वाच्या आगामी निवडणुकीत, मुंबई वगळता सर्व महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे शिंदे गट आणि मनसेत तारा जुळवून शिंदे गटाच्या वाटल्या येणाऱ्या जागांमध्ये मनसे-शिंदे यांच्यातील समझोता होणार आहे असं वृत्त आहे. परिणामी, टीका सत्ताधाऱ्यांवरच होते असं ठामपणे सांगणाऱ्या राज ठाकरेंचं भाजपाची सत्ता असलेल्या पुणे, पिंपरी, नाशिक महापालिकेतील प्रचारात तोंड बंद करून हिंदुत्वावरून शिवसेनेला लक्ष करण्याची योजना आहे अशी ‘त्या’ भाजप नेत्याने माहिती दिली.

एकनाथ शिंदे यांची मुंबईत कोणतीही राजकीय ताकद नाही तसेच मुंबईतील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल आणि फडणवीसांबद्दल कोणतही राजकीय कुतूहल नाही. शिवसेनेतील फुटीला फडणवीस जवाबदार आहेत असा ठाम समज मराठी मतदारांमध्ये झाल्याने त्यांची राजकीय प्रतिमा देखील राजकीय दृष्ट्या मलीन झाली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर भाजपचा टिकाव कसा लागणार हे अधोरेखित झाल्यावर ‘तारांवरील खेळ’ सुरु झाले असं वृत्त आहे.

मराठी, अमराठी त्यात मुस्लिम मतदार
शिवसेनेकडे आजही मोठ्या प्रमाणात मराठी मतदार आहे आणि तो मनसेला नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा आहे हे जमिनीवरील वास्तव आहे. तसेच हिंदुत्वासोबत सर्वसमावेशक भूमिका घेतल्याने मुस्लिम मतं देखील उद्धव ठाकरेंकडे वर्ग होणार असल्याची खात्री भाजपाला आहे. भाजप केवळ गुजराती आणि मारवाडी मतांवर मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकू शकत नाही, तसेच शिंदे आणि राज ठाकरेंची देखील मुंबईत मतांच्या स्वरूपात मोठी वोट बँक नाही. मुंबईतील मराठी मतदार आगामी निवडणुकीत शिंदे किंवा मनसेपेक्षा उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात मतदान करेल असा ग्राउंड झिरो रिपोर्ट सांगत आहे. त्यामुळे राज ठाकरेँमार्फत एमआयएम वर सभांमधून धार्मिक हल्ले करून आणायचे आणि हिंदू-मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्याचं भाजपने निश्चित केले आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्दे सामान्य लोकांसाठी महत्वाचे झाल्याने त्यांना हिंदुत्वावर केंद्रित करण्यासाठी राज ठाकरे महत्वाचे आहेत. कारण शिंदेंना कोणी हिंदूंचे नेते माणत नाहीत आणि तेवढं रान उठवण्याची त्यांच्या राजकीय शैलीत कुवत नाही हे भाजपाला कळून चुकलं आहे. शिंदे आणि राणे पिता-पुत्र जितकी उद्धव ठाकरेंवर अधिक टीका करतील तेवढी उद्धव ठाकरेंची मतं अधिक वाढतील अशी भीती भाजपाला देखील आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील राज ठाकरेंसोबत राजकीय तारा जुळवण्याची आदेश शिंदेंना देण्यात आले असं वृत्त आहे. त्यानंतर या हालचाली अधिक वाढल्या आहेत.

राज ठाकरेही फक्त वापरले जाणार
मनसेला स्वतःचा कोणताही पारंपरिक मतदार नाही, तसेच मनसेला मराठी मतदारही भरभरून मतदान करतो असं देखील नाही. एकाबाजूला संपूर्ण मुंबईत २०१७ मधील बीएमसी निवडणुकीत मनसेला फक्त ३,५३, ६३४ मतं पडताना त्यांचे उमेदवार थेट २१ वरून ७ वर आले होते. मनसेच्या मतांची ही आकडेवारी अगदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या ८ लाख सभासद संख्ये इतकी देखील नाही. तसेच मनसेची मुंबईत कारकर्त्यांची फळी देखील कमकुवत आहे. मात्र राज ठाकरेंसोबत जाहीर युती करून युपी-बिहारचा अमराठी मतदार भाजपवर नाराज होऊ नये शिंदे-मनसेच्या तारा जुळण्याचं निश्चित करण्यात आलं. शिंदेंच्या बाजूला मुंबईतील केवळ तीन आमदार आहेत. एक म्हणजे माहीम मतदारसंघातील सदा सरवणकर ज्यांची शिवाजीपार्क वरील दसरा मेळाव्यानंतर राजकीय हवाच निघाली आहे तर दुसऱ्या बाजूला मागाठण्याचे आमदार प्रकाश सुर्वे आणि चांदिवलीचे अवघ्या ४९० मतांच्या आघाडीने निवडून आलेले आमदार दिलीप लांडे, ज्यांची मदार युपी-बिहारी मतदारांवर आहे, मनसेसोबत शिंदेनी युती केल्यास मागाठाणे आणि चांदिवलीतील युपी-बिहारी मतदारांची मतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वर्ग होण्याची अधिक शक्यता आहे.. त्यामुळे मुंबईतील या विधानसभा क्षेत्रात माहीम-मागाठाणे आणि चांदिवली या तीन मतदारसंघात बीएमसी निवडणुकीत जे नुकसान होईल ते शिंदेंचं होईल याची भाजपला माहिती आहे. पण शिंदे गटाला आणि मनसेला उद्धव ठाकरेंविरोधात भिडवून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधनं हीच भाजपाची खेळी आहे असं भाजपच्या गोटातून समजलं आहे. कारण शिंदेंचा मुख्य फोकस हा ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका असणार आहे. , ज्या अखेर शिंदेंना राजकीय दृष्ट्या वापरून भाजपच्या ताब्यात येतील असं भाजपाला वाटतंय.

भाजप-शिंदेंसोबत घरंगळत जाण्याशिवाय राज ठाकरेंकडे मार्ग नाही
यापूर्वी मनसेसाठी राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्पर्धक होते. त्यात शिंदे गटाने भर टाकली आहे आणि त्यात कोणतही आर्थिक बळ नसल्याने मतं खेचायची तरी कशी हीच मनसेची मोठी डोकेदुखी आहे. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार आहे यात कोणताही वाद नाही. परिणामी कार्यकर्त्यांची कमकुवत फळी असलेल्या वॉर्ड मध्ये मनसे पदाधिकारी इतरांसाठी कामं करतील ही सुद्धा भीती आहे आणि यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये हे पाहायला मिळालं आहे. परिणामी, सध्या ५-६ राजकीय पक्षाच्या ओढाताणीत स्वतःचा पक्ष टिकवणं हेच मनसेसाठी महत्वाचं असणार आहे. याची पूर्ण कल्पना भाजप आणि शिंदेंना आहे आणि त्याप्रमाणे ते पावलं टाकत आहेत असंच पाहायला मिळतंय. त्यामुळे शिंदेंसोबत युती करून मोजक्या जागा पदरात पाडून घेऊन राजकीय अस्तित्व टिकवणं हे मनसेत जवळपास निश्चित झालं आहे अशी भाजपच्या गोटातून माहिती मिळाली आहे.

नगरसेवक निवडून येण्यासाठी एकूण मतं :
महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक अत्यंत कमी फरकाने निवडून येतं असतात. त्यामुळे मोजक्या जागा शिंदेंमार्फत मनसेला देऊन इतर वॉर्डातील १०००-२००० मनसेची मतं स्वतःकडे खेचणं हे देखील ‘तारा’ जुळवण्यामागील कारण आहे. शिंदे आणि फडणवीस सर्वकाही एकमेकांशी चर्चा करूनच करतात हे मनसे नेतृत्वाला माहिती आहे. पण, उद्धव ठाकरेंप्रती असलेली सहानभूती आणि खरी शिवसेना कोणती हे समजण्या इतके मतदार शहाणे असतात हे देखील मनसे नैतृत्वाला ठाऊक आहे. ही खेळी खेळत असताना भाजपाला अजूनही काही भीती आहेत असं भाजपच्या नेत्याने सांगितलं. ते म्हणजे राज ठाकरे यांच्या प्रत्येक निवडणुकीतील बदलणाऱ्या भूमिका. याआधी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत होईल असा लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार एकही उमेदवार न देता केला होता. पुढे त्याचा त्यांना कोणताही राजकीय फायदा कोणत्याही निवडणुकीत झाला नव्हता. त्यानंतर आता ते भाजप शिंदेंच्या बाजूने झुकल्याने त्यांची राजकीय विश्वासहर्ता उरली आहे की नाही याबाबत भाजपला शंका आहे. तसेच मनसेचा उमेदवार नसेल त्या वॉर्डमधील मराठी मनसेचा असलेला थोडाफार मतदार सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करेल अशी भाजपाला भीती आहे. तसेच भाजप, शिंदे गट आणि मनसेचे सर्वच नेते एकट्या उद्धव ठाकरेंवर तुटून पडल्यास त्यांचाबद्दल सहानुशुती अजून वाढण्याची देखील भाजपाला शंका असल्याचं भाजपच्या गोटातून कळालं आहे.

राज ठाकरेंच्या भूमिका मनसेच्या मुळाशी?
मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या कितीही राजकीय द्वेष करत असले तरी याच राज ठाकरेंना जेव्हा लाव रे तो व्हिडिओ सभांच्या धडाक्यानंतर भाजपाने ईडी चौकशीत गोवलं आणि राज ठाकरेंच्या संपूर्ण कुटुंबाला जेव्हा ईडी कार्यालयाच्या बाहेर काळजीपोटी उभं केलं होतं, त्यावेळी भाजप सोबत युती असूनही सामना मुखपत्रात राज ठाकरेंविरोधातील कारवाई चुकीची असल्याचं ठळकपणे म्हटले गेले होते. मात्र तेच राऊत ईडीच्या कचाट्यात अडकले तेव्हा याच मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. त्यामुळे देव माणूस फक्त शिवतीर्थावर आहे आणि मातोश्रीवर फक्त निष्ठुर माणूस बसलाय असा मनसे कार्यकर्त्यांचा मागच्या काळापासून भ्रम झालाय. त्याच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर शिवतीर्थावर भाजप नेत्यांच्या आरत्या ओवाळताना बघण्याची वेळ आली आहे, ज्यांनी मनसे नेतृत्वाला ईडी चौकशीत गोवलं होतं. भर सभेत मोठी भक्तांना ‘लवारीस कारटी’ असं संबोधणाऱ्या राज ठाकरेंनी, त्यांच्या सतत बदलत राहणाऱ्या राजकीय भूमिकेमुळे आता मनसे कार्यकर्त्यावरच मोदी भक्तांना कमरेवर उचलून प्रचार करण्याची वेळ आणली आहे अशी टीका समाज माध्यमांवर आधीच सुरु झाली आहे.

ईडी चौकशीनंतर घरी परतल्यावर राज ठाकरे म्हणाले होते की माझं तोंड कोणीही बंद करू शकत नाही. पण वास्तविक भाजपच्या बाबतीत राज ठाकरेंचं तोंड पूर्णपणे बंद झालं आहे आणि ते सध्या कोणत्या ना कोणत्या तरी विषयावरून मोदी-शहा आणि योगी आदित्यनाथ यांचे धन्यवाद मानण्याची संधीच शोधत असतात हेच पाहायला मिळतंय. मध्यंतरी, देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत राज ठाकरेंबाबत म्हणाले होते की, “राज ठाकरे अवस्था कशी आहे, एखादा व्यक्ती क्रिकेटमधून रिटायर्ड झाल्यावर तो काय करतो?… कॉमेंट्री करतो… अर्थात तो मानधन घेऊन करतो.. हे तसं करतात की नाही ते आपल्याला माहिती नाही… तशीच सध्या राज ठाकरेंची अवस्था आहे… ते आता केवळ कॉमेंट्री करत आहेत… ते खेळात नाहीत… नॉन प्लेइंग पर्सन आहेत… पण ठीक आहे. आता ज्याची सुपारी आपण घेतली ती सुपारी वाजवावी तर लागेल.. ते ती वाजवत आहेत…

तर त्या ताराही निवडणुकी आधीच गंजून जातील :
अजून शिंदे गटाचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद हा सुप्रीम कोर्टात निकालाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र हा निकाल शिंदेंच्या विरोधात गेल्यास उद्धव ठाकरेंची राजकीय बाजू अजून भक्कम होईल आणि मनसे-शिंदेंमधील जुळलेल्या तारा निवडणुकीआधीच गंजून जातील असं राजकीय विश्लेषक सांगतात. प्रत्येक निवडणुकीत राजकीय भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरेंसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. कारण यावेळी त्यांचा निर्णय कोणत्याही घडामोडींमुळे फसला तर त्याची किंमत मनसेला पुढील १०-१५ वर्ष भरून काढता येणार नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात.

 

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Shinde alliance after BKC rally flop rally of Shinde camp check details 26 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x