3 December 2024 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

मनसे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 'भगवी' झुंज देणार; ५८ जागा लढणार

MNS Raj Thackeray, Aurangabad Corporation Election 2020

औरंगाबाद : एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. पक्षाने सर्व ११५ वॉर्डातून उमेदवार देण्याची तयारी दर्शवली असली तरी आजच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे ५८ वार्डातील इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. या वार्डातून इच्छूक असललेल्यांची यादी देखील तयार करण्यात आली असून लवकरच ती पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यात शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केल्यामुळे या पक्षातील नाराजांना प्रवेश देऊन येणाऱ्या महापालिकेत चांगली कामगिरी करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

मनसेने आगामी महापालिका निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका केली गेली. मात्र मनसेने कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत आपल्या पक्षाचा झेंडा आणि ध्येय धोरणे देखील बदलली. 9 फेब्रुवारी रोजी देशातील पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात काढण्यात येणार मोर्चा हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.

मागील वर्षी शिवसेनेचे माजी महापौर सुदाम मामा सोनावणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला होता. मनसेकडून त्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता असून त्यांचा शहरात चांगला दबदबा आहे.

तर दुसरीकडे हिंदुत्वाचा अजेन्डा हाती घेतल्याने औरंगाबाद मधील शिवसेनेला मनसे अधिक हवी झाली आहे. दरम्यान, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा लोकसभा संघटक सुहास दाशरथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेऊन तशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. सुहास दाशरथे मागील ३९ वर्ष शिवसेनेत कार्यरत असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. दाशरथेंचा मनसे प्रवेश हा खैरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का असेल.

 

तत्पूर्वी २०१८ च्या नोव्हेंबर मध्ये मनसेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून औरंगाबादमध्ये विराट दंडुकामोर्चा काढला होता ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळायचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने शिवसेनेच्या हिंदुत्वावरील विश्वास खालावल्याच पाहायला मिळत आहे तर राज ठाकरे यांच्याकडे कडवट हिंदुत्ववादी म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत मनसे थेट एमआयएम’शी दोन हात करेल अशीच अधिक शक्यता आहे.

 

Web Title:  MNS will contest Aurangabad Corporation Election 2020.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x