25 December 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

मोदी सरकारकडून राज्य सरकारची आर्थिक कोंडी | निसर्ग चक्रीवादळ व मास्कचे पैसेही अडवून

Modi Government, financial crisis, Maharashtra CM Uddhav Thackeray

मुंबई, २३ ऑक्टोबर: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाहून गेले आहे. या अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आर्थिक मदतेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे १०,००० कोटी रुपये विविध कारणआंसाठी असणार आहेत. शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्धवस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल या सर्व गोष्टींसाठी दहा हजार कोटी आम्ही जाहीर करत आहोत.

दरम्यान, राज्याच्या हक्काचे पैसे अडवून केंद्र सरकार महाराष्ट्राची आर्थिक कोंडी केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. केंद्र सरकारने निसर्ग चक्रीवादळ आणि मास्कचे पैसेही अडवून ठेवल्याने राज्याची स्थिती अवघड झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना संकटात राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला कर्ज काढावं लागले. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना राज्य सरकारला केंद्र सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलीय. केंद्राकडून राज्याला ३८ हजार कोटी रुपये येणं असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray has accused the Center of creating financial difficulties for Maharashtra by withholding money from the state. Thackeray said the state’s situation has become difficult as the central government has also withheld money for nature hurricanes and masks. The state’s economic woes have been shaken by the Corona crisis. The state government had to take out loans for the salaries of the employees. Chief Minister Uddhav Thackeray has complained that the state government is not getting any financial help from the central government when the state’s financial situation is dire. Uddhav Thackeray has claimed that the state should get Rs 38,000 crore from the Center.

News English Title: Modi Government created a financial crisis in Maharashtra Chief Minister Thackeray News updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x